Join us

Shah Rukh Khan : Video - जबरी फॅन्स! शाहरुखच्या 300 चाहत्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; 'मन्नत' बाहेर रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 10:30 AM

Shah Rukh Khan : शाहरुखने चाहत्यांसाठी तीच आयकॉनिक पोझ दिली, जी तो वर्षानुवर्षे करत आला आहे. पण यावेळी असं काही घडलं की विश्वविक्रम झाला.

अभिनेता शाहरुख खानने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शाहरुखचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील बांद्रा येथील त्याच्या 'मन्नत' निवासस्थानाबाहेर हजारो चाहते दररोज गर्दी करत असतात. प्रत्येकजण एक झलक पाहण्याइतका भाग्यवान नसतो, परंतु काही वेळा पठाण स्टार घराच्या बाल्कनीतून बाहेर येत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देत असतो.

शनिवारच्या दिवस शाहरूख आणि त्याच्या फॅन्ससाठी थोडा वेगळा होता. कारण यावेळी इतिहास रचला गेला आहे. शाहरुख खानने आपल्या उपस्थितीने चाहत्यांना आनंदित केलं आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तो बाहेर आला. शाहरुखने चाहत्यांसाठी तीच आयकॉनिक पोझ दिली, जी तो वर्षानुवर्षे करत आला आहे. पण यावेळी असं काही घडलं की विश्वविक्रम झाला. शाहरुखच्या चाहत्यांनी मिळून एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

शाहरुख खानचे जवळपास 300 चाहते मन्नतच्या बाहेर त्याच पोझमध्ये हात पसरून उभे होते. किंग खाननेही त्याच्यासोबत त्याच्या बाल्कनीतून तीच पोझ दिली. जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांनी असं करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

शाहरुख चाहत्यांना फ्लाइंग किस करताना आणि दोन्ही हात पसरून त्याची आयकॉनिक पोझ देताना दिसला. त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' मधील 'झूम जो पठाण' गाण्याची हुक स्टेप देखील केली. यानंतर चाहते जल्लोष करताना आणि प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. किंग खाननेही आपल्या फॅन्सचे आभार मानले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड