Join us

गौरी खानसाठी शाहरुख खान खूपच पझेसिव्ह, केस मोकळे ठेवण्यावरही लावायचा निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:38 PM

शाहरुख आणि गौरी म्हणजे बॉलिवूडमधलं आदर्श जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवरफुल कपल पैकी एक मानले जाते. आजही शाहरुख गौरीबाबतचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. ऐवढेच नाही तर एकेकाळी शाहरुखनने गौरीला मिळवण्यासाठी आपली संपूर्ण कारकर्किदपणाला लावली होती.  गौरीचं लग्नाआधीचं नाव गौरी छिब्बर. शाहरुख आणि गौरी म्हणजे बॉलिवूडमधलं आदर्श जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आहेत. मात्र त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच आहे. 

 अनुपमा चोपडा यांच्या 'किंग ऑफ बॉलिवूडः शाहरुख खान और सिडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा.' या पुस्तकात त्यांनी गौरी खान आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला होता. या पुस्तकात अनुपमा यांनी लिहिले आहे, शाहरुख गौरीला घेऊन पझेसिव्ह होता, म्हणून गौरीने त्याला सोडून दिले होते. त्यानंतर गौरीने त्याला माफ केले. शाहरुखने गौरीच्या कुटुंबाला लग्नासाठी तयार केले होते. यासर्व गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात आहे. मोकळ्या केसात गौरी सुंदर दिसायची म्हणून शाहरुख तिला केस सुद्धा मोकळे सोडू द्यायचा नाही. एकदा गौरीने केस मोकळे सोडले होते म्हणून त्यांना हंगामा केला.   

शाहरुख आणि गौरीने 1991 मध्ये लग्न केले होते. त्यावेळी शाहरुख खान ‘दीवाना’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होता. चित्रपट निर्माते एफ. सी. मेहरा म्हणाले की शाहरुखने त्याचे लग्न तोपर्यंत पुढे ढकलले पाहिजे जोवर सिनेमा रिलीज होत नाही. यावर शाहरुख म्हणाला मी लग्न पुढे ढकलणार नाही, मात्र सिनेमा सोडून देईन. 

1992मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता, 'माझी पत्नी माझ्या आयुष्यात प्रथम येते, आणि जर मला पुढे आयुष्यात कधी गौरी आणि करिअरमधून एखादी गोष्ट निवडायला सांगितली गेली तर मी सिनेमा सोडून देईन, गौरीच्या प्रेमात मी वेडा आहे. माझ्याकडे फक्त गौरी आहे आणि माझं माझं गौरीवर नितांत प्रेम आहे.  

टॅग्स :शाहरुख खानगौरी खान