Join us

नवीन संसद भवनाच्या व्हिडिओला शाहरुख खानने दिला आवाज, पंतप्रधान म्हणाले, "खूप सुंदर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 9:58 AM

शाहरुखने ट्वीट केलेला हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी रिट्वीट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. तर यापूर्वी २६ मे रोजी पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबतच त्यांनी लोकांना विनंती केली होती की या व्हिडिओला आवाज द्या आणि सोशल मीडियावर हॅशटॅग 'माय पार्लमेंट माय प्राईड' नावाने पोस्ट करा. यानंतर अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी आणि सामान्य लोकांनी व्हिडिओला आवाज दिला. दरम्यान अभिनेता शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) या व्हिडिओला आवाज दिला आहे.

नव्या संसद इमारतीच्या या व्हिडिओला आवाज देताना शाहरुख म्हणाला, "नवीन संसद भवन. आपल्या अपेक्षांचं नवीन घर, आपल्या संविधानाची रक्षा करणाऱ्यांसाठी एक असं घर,  जिथे १४० कोटी हिंदुस्थानी कुटुंब आहे. हे नवीन घर इतकं भव्य असू दे की इथे देशातील प्रत्येक प्रांत, गाव, शहर आणि कानाकोपऱ्यातील सर्वांसाठी जागा असेल. प्रत्येक जाती प्रजाती आणि धर्मावर याचं प्रेम असो. या घराची नजर इतकी तीक्ष्ण असू दे की प्रत्येक नागरिकाला पाहू शकेल, ओळखू शकेल आणि त्यांच्या समस्या समजू शकेल. इथे सत्यमेवचा जयघोष केवळ स्लोगन नाही तर विश्वास असो."

शाहरुखने ट्वीट केलेला हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी रिट्वीट करत लिहिले, "खूप सुंदर मांडणी. संसदेची नवी इमारत लोकशाहीची ताकद आणि विकास दाखवणारी आहे. परंपरा आणि आधुकनिकतेचं मिलन आहे. #myparliamentmypride 

पंतप्रधानांच्या आवाहनावरुन शाहरुखसोबतच अभिनेते अनुपम खेर, अक्षय कुमार, मनोज मुंतशिर यांनी देखील व्हिडिओला आवाज दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी हवन विधी केला, तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चारात केला होता. लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. 

टॅग्स :संसदनरेंद्र मोदीशाहरुख खानभारतदिल्ली