Join us

- म्हणून शाहरूख खान झाला ट्रोल, शबाना आझमींनी असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:59 AM

शाहरूख खानने दिवाळीच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला. पण फोटो शेअर करताच तो ट्रोल झाला.

ठळक मुद्दे काही लोकांना शबानांची ही गोष्टही खटकली. यानंतर शबाना यांनाही लोकांनी ट्रोल केले.

सध्या सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अगदी प्रियंका चोप्रापासून अक्षयकुमारपर्यंत सगळ्यांनीच आपआपले फोटो पोस्ट केलेत. शाहरूख खान यानेही दिवाळीच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला. पण फोटो शेअर करताच तो ट्रोल झाला.शाहरूखने दिवाळीच्या शुभेच्छा देत पत्नी गौरी व मुलगा अबरामसोबतचा फोटो शेअर केला.  या फोटोत केवळ तिघांचे डोळे आणि  कपाळावरचा कुंकवाचा टिळा  तेवढा दिसतोय. पण नेमक्या या कुंकवाच्या टिळ्यामुळेच शाहरूखला ट्रोल केले गेले. 

तू मुस्लिम आहेस, त्यामुळे तू हे करायला नको, असे एका युजरने लिहिले. तर एकाने ‘हा काय भगवा रंग? आता तुझाही फतवा निघणार का? की फतवे फक्त महिलांसाठी आहेत?’ असा सवाल केला.

ट्रोलर्सच्या या प्रश्नांवर शाहरूख तर काही बोलला नाही. पण अभिनेत्री शबाना आझमी मात्र यानिमित्ताने ट्रोलर्सवर बरसल्या. ‘शाहरूखने दिलेल्या दिवाळी शुभेच्छांमुळे काही मुस्लिम संतापले, हे बघून मी हैराण आहे. केवळ कुंकवाचा टिळा लावला म्हणून लोक त्याला ‘खोटा मुसलमान’ ठरवत आहेत. मुस्लिम धर्म इतका कमकुवत नाही की, भारतीय परंपरा स्वीकारल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात येईल. भारताचे सौंदर्य तिच्या ‘गंगा जमुनी’ परंपरेत आहे,’ असे शबाना यांनी लिहिले.अर्थात काही लोकांना शबानांची ही गोष्टही खटकली. यानंतर शबाना यांनाही लोकांनी ट्रोल केले. ‘शांतीदूतांनी काय विशेष टिप्पनी केलीय,’ असे खोचकपणे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने, ‘ये इस्लाम भी बडी जल्दी खतरे में आ जाता है,’ असे लिहित शबानांना ट्रोल केले.

टॅग्स :शाहरुख खानशबाना आझमीदिवाळी 2022