Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जवान' अन् 'पठाण' च्या यशानंतर शाहरुख खानला मिळाली Y+ सुरक्षा, मन्नतबाहेर पोलिस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 09:00 IST

तो जिथे जाईल तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होत आहेत.

अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) यंदा बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले. 'पठाण' आणि 'जवान'च्या तुफान यशानंतर किंग खानची क्रेझ आणखी वाढली आहे. तो जिथे जाईल तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होत आहेत. अशातच शाहरुखच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. हे पाहता शाहरुख खानला Y प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

शाहरुख खान बॉलिवूडचा किंग आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. त्याची फॅन फॉलोईंग आधीही होतीच. आता चाहते त्याला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने त्याला सुरक्षा दिली आहे. शाहरुख खानसोबत ६ पोलिस कमांडो असतील. देशात कुठेही फिरताना त्याला ही सुरक्षा असेल. या सुरक्षारक्षकांजवळ एमपी 5 मशीन गन, एके-47 असॉल्ट राइफल आणि ग्लॉक पिस्तुल असणार आहे. त्याच्या घरीही ४ पोलिस तैनात असणार आहेत. 

शाहरुख खान स्वत:च उचलणार खर्च

शाहरुख खान आपल्या सुरक्षेचा खर्च स्वत:च उचलणार आहे. भारतात खाजगी सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असू शकत नाही. यासाठी पोलिस तैनात असणं आवश्यक आहे. स्पेशल आयजीपी, व्हीआयपी सिक्योरिटी दिलीप सावंत यांच्या अधिसूचनेनुसार, सिनेस्टार शाहरुख खानची वाढती क्रेझ पाहता त्याच्या जीवाला धोका असून शकतो. यासाठी सर्व यूनिट कमांडोला विनंती की ते त्याला एस्कॉर्ट स्केलसोबतच वाय + सुरक्षा द्यावी.'

टॅग्स :शाहरुख खानपोलिसबॉलिवूडमुंबईमहाराष्ट्र