बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shahrukh Khan) दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. ‘झिरो’ रिलीज झाला आणि रिलीज झाला तसा दणकून आपटला. तेव्हापासून शाहरूखचा एकही नवा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. अर्थात लवकरच तो ‘पठान’ या सिनेमात दिसणार आहे. पण तूर्तास चर्चा त्याच्या या सिनेमाची नाही तर त्याच्या एका व्हिडीओची आहे. शाहरूखचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि विशेष म्हणजे, हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.काल शनिवारी शाहरूख खान एका बिल्डिंग बाहेर स्पॉट झाला. यावेळी त्याचा मुलगा आर्यनही त्याच्यासोबत होता. शाहरूखने ओव्हरसाइज्ड ब्लॅक स्वेटशर्ट घातला होता. तर आर्यन ग्रीन टीशर्ट, ब्लॅक फेडेड जॅकेट व डेनिम अशा लुकमध्ये होता.
शाहरूख व आर्यनला एकत्र पाहून पापाराझींचे कॅमेरे पुढे सरसावले. फोटोग्राफर्स त्याला आवाज देत राहिले पण ना शाहरूखने दखल घेतली, ना आर्यनने. फोटोग्राफर्सकडे कानाडोळा करत दोघेही आले तसे निघून गेलेत. हा व्हिडीओ पाहून नेटकºयांनी काहीशा संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. ‘इतका भाव खाणा-या लोकांना महत्त्व द्यायचेच का? अशी कमेंट एका युजरने केली. माज किती बघा, अशी कमेंट अन्य एका युजरने केली. बॉलिवूड कलाकारांपेक्षा साऊथचे अॅक्टर बरे आहेत, ते रिस्पेक्ट तरी देतात, अशी प्रतिक्रिया दिली.
अॅटिट्यूड तर पाहा साहेबांचा, अशी खोचक प्रतिक्रिया एका युजरने दिली. अर्थात काहींनी शाहरूखचा सपोर्टही केला. स्टार्सलाही पर्सनल लाईफ आहे, अशा शब्दांत एका युजरने शाहरूखची बाजू घेतली. आर्यनला माज आहे, म्हणणे योग्य नाही. तो लाजाळू आहे, गर्विष्ठ नाही, अशा शब्दांत एकाने आर्यनला सपोर्ट केला. सध्या शाहरूख ‘पठान’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण व जॉन अब्राहम दिसणार आहेत. याशिवाय शाहरूखने साऊथ दिग्दर्शक एटली यांच्या एका सिनेमाचे शूटींग सुरू केल्याचीही चर्चा आहे.