बॉलिवूडमध्ये किंग ऑफ रोमान्स नावाने ओळखला जाणारा शाहरूख खान सुमारे दीड वर्षांपासून घरी बसलाय. डिसेंबर 2018 मध्ये ‘झीरो’ या सिनेमात तो अखेरचा दिसला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत शाहरूखचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण म्हणून शाहरूखकडे पैशांची कमतरता नाही. दीड वर्षांपासून एकही चित्रपट केला नसला तरी आजही शाहरूख सलमान खान व अक्षय कुमारपेक्षा कितीतरी पट अधिक श्रीमंत आहे.
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, शाहरूखकडे 600 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 4500 कोटी रूपयांची प्रॉपर्टी आहे. सलमान खान याबाबतीत बराच मागे आहे. त्याच्याकडे 310 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 2325 कोटींची संपत्ती आहे. तर अक्षय कुमार 273 मिलियन डॉलर म्हणजेच 2047 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मुंबईत शाहरूखचा कोट्यवधी रूपयांचा बंगला आहेख पण याशिवाय दुबईतही त्याचे अलिशान घर आहे. अलिबाग येथे त्याचे हॉलिडे होम आहे. याची किंमत 1 हजार कोटी रूपये असल्याचे कळते. शाहरूखने मन्नत केवळ 13 कोटींना खरेदी केला होता. आज त्याची किंमत 200 कोटींपेक्षा अधिक आहे. गेल्या 25 वर्षांपासून शाहरूख आपल्या कुटुंबासोबत याच बंगल्यात राहतोय. याशिवाय लंडनच्या पार्क लेन या पॉश भागातही त्याची प्रॉपर्टी आहे.
अॅक्टर असण्यासोबतच शाहरूख एक निर्माताही आहे. त्याची रेड चिली ही प्रॉडक्शन कंपनी बॉलिवूडची एक मोठी प्रॉडक्शन कंपनी आहे. याशिवाय तो कोलकाता नाइट राइडर्स या आयपीएल टीमचा मालक आहे.
शाहरूखकडे एकापेक्षा एक महागड्या व अलिशान गाड्या आहेत. यात आॅडी ए6 (28 लाख ), बुगाती वेरॉन (12 कोटी), टोयोटा लँड कूजर (44 लाख ), रोल्स रॉयस (2.9 कोटी), बीएमडब्ल्यू आई8 (2.29 कोटी), मर्सिडीज बेंज एस600 गार्ड (2.8 कोटी), बीएमडब्ल्यूआई8 (90 लाख) या गाड्यांचा समावेश आहे.शाहरूखने छोट्या पडद्यापासून सुरूवात केली आणि यानंतर बॉलिवूडमध्ये धडाकेबाज एन्ट्री घेतली. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिल्यानंतर एक वेळ अशी आली की, शाहरूख बॉलिवूडचा किंगखान म्हणून ओळखला जाऊ लागला.