Join us

शाहरुख खान दिवसभरात ओढायचा 100 सिगरेट, 30 वर्षांनंतर अशी केली स्वत:ची सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 10:03 AM

बॉलिवूडचा किंग खान हा दिवसाला तब्बल १०० सिगारेट ओढायचा.

अनेकजण हौस म्हणून सुरुवातीला सिगारेट ओढून बघतात. पण ही हौस कधी व्यसनात बदलते, हे कळतसुद्धा नाही. त्यानंतर मात्र व्यसन सोडण्यासाठी खूपच प्रयत्न करावा लागतो. परंतु तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर तुम्ही सिगारेट ओढण्याचं व्यसन नक्की सोडू शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण बॉलिवूडचा किंग खान हा दिवसाला तब्बल १०० सिगारेट ओढायचा. पण त्यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर हे व्यसन सोडलं.

शाहरुख खानने 2 नोव्हेंबरला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा केला.  शनिवारी वाढदिवसानिमित्त 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रमात चाहत्यांची भेट घेतली. यावेळी कार्यक्रमात शाहरुखने 30 वर्षांनंतर धूम्रपान सोडल्याचं जाहीर केलं. तो म्हणाला,  मित्रांनो, मी आता धूम्रपान करत नाही. मला वाटलं होतं की श्वासोच्छवासाचा त्रास होणार नाही. पण, तो होतोय. इन्शाअल्लाह, तेही लवकर बरे होवो". शाहरुख खानने चाहत्यांना धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला.

पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटातून बॉक्स ऑफिसला हादरवणारा शाहरुख खान आता 2026 मध्ये 'किंग' बनून पुन्हा एकदा धमका उडवणार आहे. मुलगी सुहाना खानसोबत तो पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणर आहे. 'किंग' या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 2026 च्या ईदला रिलीज होऊ शकतो. किंग व्यतिरिक्त 'टायगर विरुद्ध पठाण' हा देखील शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आहे. यामध्ये तो सलमान खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शाहरुख खानधूम्रपानसिगारेट