Join us

'जवान'चे २ किंवा ३ नाही तर ५ लुक्स आऊट, शाहरुखने व्हिडिओ शेअर करत दिलं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:10 IST

ही तर फक्त सुरुवात आहे....

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. जितकी जवानची चर्चा होत आहे तितकीच उत्सुकता आणखी ताणली जात आहे. या आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. मात्र कोणत्या तारखेला रिलीज होणार हे अजूनही समोर आलेलं नाही. ट्रेलरच्या आधीच शाहरुखने चाहत्यांना वेगळंच सरप्राईज दिलंय. 'जवान'मधील २ नाही ३ नाही तर पाच लुक्स शेअर केले आहेत. 

शाहरुखने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एकानंतर एक त्याचे पाच लुक्स समोर येत आहेत. याला त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'ये तो शुरुआत है...द मेनी फेसेस ऑफ जस्टिस...ये तीर है..अभी ढाल बाकी है...ये अंत है अभी काल बाकी है...ये पूँछता है खुदसे कुछ...अभी जवाब बाकी है. प्रत्येक चेहऱ्याच्या मागे एक उद्देश्य आहे. पण ही फक्त सुरुवात आहे.'शाहरुखने व्हिडिओ पोस्ट केल्यापासून 'जवान' ट्रेंडिंगवर आहे.

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीने 'जवान'चे दिग्दर्शन केले आहे. साऊथमधील अनेक सुपरहिट कलाकार जवानमध्ये झळकणार आहेत. साऊथ ब्युटी नयनताराच्या लुकवर चाहते फिदा झालेत. याशिवाय प्रियमणि आणि सुपरस्टार विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत आहे. दीपिका पदुकोणचा सिनेमात स्पेशल अपिअरन्स आहे. ७ सप्टेंबरला सिनेमा रिलीज होत आहे.

टॅग्स :शाहरुख खानसिनेमानयनतारा