Join us  

​शाहरुख खान म्हणतो, माझा मुलगा अबराम नव्या पिढीचा ‘सुपरस्टार’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 11:32 AM

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा ‘सुपरस्टार’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. ...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा ‘सुपरस्टार’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट चांगली कमाई करीत असून तो आजही ‘सुपरस्टार’ आहे हे दर्शविण्यात तो यशस्वी ठरला आहे. अशातच त्याला मिळालेली ‘सुपरस्टार’ ही बिरुदावली आगामी काळात त्याचा मुलगा अबराम याला मिळेल, असे शाहरुख खानला वाटू लागले आहे. मागील काही दिवसांपासून शाहरुख आपला मुलगा अबराम सोबत खेळताना दिसला आहे. त्याने त्याच्याविषयीचे अनेक किस्से देखील मीडियासमोर उघड केले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अबराम हा नव्या पिढीतील ‘सुपरस्टार’ असेल असे सांगितले. बॉलिवूडमधून सुपरस्टार ही संकल्पना शाहरुख खाननंतर बाद होईल या प्रश्नाच्या उत्तर देत होता. शाहरुख म्हणाला, ‘अबराम आहे ना पुढला सुपरस्टार’. अबराम फक्त तीन वर्षांचा आहे. या मुलाखतीमध्ये शाहरुख सोबत त्याचा मुलगा अबरामही सोबत होता. Read More : ​‘रईस’ची गँग सक्सेस पार्टीत पाळणार ‘ड्राय डे’!शाहरुख खान म्हणाला, अबरामला माझा रईस हा चित्रपट आवडला. सर्व सामान्य प्रेक्षकांप्रमाणे तो देखील सनी लिओनीच्या ‘लैला ओ लैला’ या गाण्यावर नाचला. मी या चित्रपटात जेव्हा गुंडाना मारत होतो त्यावेळी तो म्हणायचा ‘जाओ पापा जाओ पापा’. रईसमध्ये अक्शन अवतारात दिसलेला शाहरुख म्हणाला, मला बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन स्टार म्हणून संधी मिळाली नाही. मी लहान असताना चांगली अ‍ॅक्शन करायचो कारण मी जिम्नॉस्ट होतो आणि चांगला धावकही, मात्र मला अ‍ॅक्शन रोल आॅफर झालेच नाहीत. आता खूप उशीर झाला आहे, मात्र मला अ‍ॅक्शन करायला आवडते. Read More : शाहरूख खानचा मुलगा अबराम जेव्हा नाचतो ‘लैला मैं लैला’ वर...शाहरुख खानचा मागील दोन चित्रपट बॉक्स आॅफिसवर अयशस्वी ठरल्याने मला दु:ख झाले होते. विशेषत: फॅनच्या अपयशाने माझ्या हृदयावर आघात झाला. पण मी धीर सोडला नाही. शाहरुख म्हणाला, माझ्या चित्रपटांना मोठी ओपनिंग मिळते, चाहते अपेक्षा घेऊन माझा चित्रपट पाहयला येतात. त्याचा हिरमोड मी करू शकत नाही, म्हणून त्यांना जे हवे आहे, ते दिलेच पाहिजे. मात्र नेहमी नेमही एक सारख्या भूमिका करूनही कंटाळा येतो. शाहरुख खान सध्या गौरी शिंदे, इमत्यिाज अली आणि आनंद एल. राय यांच्यासारख्या नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करीत आहे याचा मला आनंद वाटतो असेही तो म्हणाला. ALSO READ  सनी लिओनीच्या ‘लैला’वर लोकांचा थिएटरमध्ये धिंगाणा डान्स!शाहरुख खान म्हणाला, माझे वय आता रोमँटिक चित्रपटासाठी नाही!