बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा नुकताच 'झिरो' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरूखने बव्वा सिंग या बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात शाहरूख खानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. आता शाहरूख भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत.
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारे जहाँ से अच्छा असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे किंवा जूनमध्ये सुरुवात होणार होती. मात्र 'झिरो' चित्रपटाच्या अपयशानंतर यातून बाहेर येण्यासाठी किंग खानने स्वतःला व्यग्र करुन घेण्यासाठी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला फेब्रुवारीतच सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर राकेश शर्मा यांच्या पत्नीची भूमिका निभावताना दिसणार आहे. जूनपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे करणार आहेत.बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी शाहरूख अमेरिकेला जाऊन ट्रेनिंग घेणार आहे. तिथे तो अंतराळवीरांसारखा विषम स्थितीत राहणार आहे. त्यामुळे तो या सिनेमातील भूमिका चांगल्याप्रकारे समजू शकेल आणि अंतराळवीरांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे देखील समजेल. शाहरूख या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सप्टेंबरमध्ये सुरूवात करणार होता. मात्र आनंद एल. रॉय यांच्या 'झिरो' चित्रपटामुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. तसेच राकेश शर्मा बायोपिकचे नाव आधी सॅल्यूट ठेवण्यात आले होते. मात्र नंतर हे शीर्षक बदलण्यात आले असून आता 'सारे जहाँ से अच्छा' असे ठेवण्यात आले आहे.