Join us

Gayatri Joshi: इटलीत झालेल्या कार अपघातानंतर पहिल्यांदाच मीडियाच्या कॅमऱ्यासमोर आली गायत्री जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 11:24 AM

इटलीत झालेल्या भीषण कार अपघातानंतर गायत्री जोशी पहिल्यांदाच मीडियासमोर आली.

शाहरुख खानसोबतच्या 'स्वदेश' चित्रपटात गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय इटलीमध्ये झालेल्या कार अपघातामुळे चर्चेत आले होते. या कार अपघातानंतर दोघे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. मंगळवारी रात्री मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

इटलीमध्ये अभिनेत्री पतीसोबत लँबोर्गिनीची सैर करत असतानाच त्यांच्या गाडीने समोरील फरारीला धडक दिली. या घटनेनंतर गायत्री अचानक चर्चेत आली होता. यानंतर ती पहिल्यांदाच पतीसोबत मुंबईतल्या एका मोठ्या इव्हेंटमध्ये दिसली. यावेळी तिने स्टायलिश पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. विकास ओबेरॉय यांनी निळ्या रंगाचा सूट घातला होता.

 गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीमध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले होते. इटलीच्या रस्त्यावर अतिशय वेगाने लक्झरी गाड्या एकमागोमाग एक जात होत्या. त्यातच गायत्री आणि तिचे पती विकास ओबेरॉय लाल रंगाच्या लँबोर्गिनीत होते. तर निळ्या रंगाच्या फरारीमध्ये स्वित्झर्लंडचं जोडपं होतं. लँबॉर्गिनीची धडक बसताच समोर असलेला टेम्पोही उलटला. शिवाय फरारीला आग लागली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

गायत्रीने स्वत: द फ्री प्रेस जर्नलला या कार अपघाताबाबत सांगितले होते, 'विकास आणि मी इटलीमध्ये आहोत. इथं आम्ही एका अपघाताचे शिकार झाला. पण देवाच्या कृपेने आम्ही दोघेही पूर्णपणे बरे आहोत. गायत्रीबद्दल बोलायचे झाले तर ती  शाहरुख खानच्या 'स्वदेस' सिनेमामुळे चर्चेत आली होती. एकच सिनेमा केल्यानंतर तिने अभिनयाला रामराम केला आणि ती लग्नबंधनात अडकली. यानंतर तिने पतीच्या व्यवसायात हातभार लावला. त्यांना दोन मुलंही आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीशाहरुख खान