Join us  

शाहरुख खानने 'या' भारतीय क्रिकेटपटूला बनवलं जावई; पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:33 AM

'या' क्रिकेटपटूला उद्देशून शाहरुख खान म्हणाला, 'तो तर मला जावयासारखा...'

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'जवान' ला मिळणारं यश एन्जॉय करतोय. पठाण आणि जवान हे दोन ब्लॉकबस्टर हिट दिल्यानंतर तो शाहरुख आता 'डंकी' मधूनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. एकाच वर्षात तीन हिट देण्यासाठी तो सज्ज झालाय. नुकतंच त्याने नेहमीप्रमाणे ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी शाहरुखने एका क्रिकेटरचा तो मला जावईसारखा असा उल्लेख केला. कोण आहे तो क्रिकेटर बघा.

शाहरुख खान ट्विटरवर आस्क एसआरके सेशनमधून चाहत्यांशी गप्पा मारतो. त्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरंही देत असतो. दरम्यान एका युझरने ट्वीट केले,'सर विराट कोहलीबद्दल काहीतरी बोला. कारण रोज आम्ही चाहत्यांमध्ये वाद होताना बघतोय. जवान स्टाईलमध्ये कोहलीबद्दल काहीतरी बोला.'

चाहत्याच्या विनंतीचं उत्तर देत शाहरुख म्हणाला,'मला विराट कोहली  खूप आवडतो. तो तर माझाच आहे आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी नेहमीच प्रार्थना करेन. भाई जावईसारखाच आहे आमचा.'

शाहरुखने सोबतच वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहेत. शाहरुख खानसोबत 'रब दे बना दी जोडी' याच सिनेमातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. 

टॅग्स :शाहरुख खानविराट कोहलीअनुष्का शर्मा