Join us  

Video: शाहरुखवर नेटकरी नाराज, 'त्या' व्हिडिओनंतर किंग खानवर होतेय जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 5:03 PM

शाहरुख खानला ७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रोमान्सचा बादशहा अशीही त्याची ओळख आहे. याशिवाय शाहरुख खऱ्या आयुष्यातही किती आदबीने राहतो याची उदाहरणं आजपर्यंत अनेक लोकांनी दिली आहेत. मात्र त्याच्या नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे शाहरुखचे चाहतेही त्याच्यावर नाराज झालेत. या व्हिडिओत  तो चक्क एका वृद्ध माणासाला ढकलताना दिसतोय.

शाहरुख खानला ७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिला भारतीय अभिनेता आहे. पुरस्काराच्या आधी शआहरुख खान रेड कार्पेटवर माध्यमांसमोर पोज देत होता. लांब केस आणि पूर्ण ब्लॅक आऊटफिटमध्ये तो चार्मिंग दिसत होता. याचवेळी त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका वृद्ध पत्रकाराला शाहरुखने मागे ढकलले. तो माणूस कदाचित शाहरुखच्या फ्रेममध्ये येत होता. मात्र म्हणून त्याला अशा पद्धतीने ढकलणं योग्य नाही असं म्हणत अनेकांनी शाहरुखवर टीका केली आहे. X वर सध्या अनेक युझर्स शाहरुखचा हा व्हिडिओ शेअर करत 'शेम ऑन यू SRK' असं म्हणत आहेत. तर काहींनी त्याची बाजू घेत 'तो मस्करी करत आहे' असंही बोललेत. शाहरुखचं अद्याप यावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र त्याच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर त्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात बोलणारे असे दोन गट पडलेत. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसोशल मीडियाट्रोल