Join us  

Shahrukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचं वैष्णोदेवीला साकडं; 'बॉयकॉट'च्या भीतीने मक्केनंतर मंदिरात पोहोचला 'पठाण'!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:50 AM

'पठाण' चित्रपटातुन शाहरुख धमाका करण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या यशासाठी सध्या शाहरुख अनेक देवस्थळांना भेटी देतोय.

Shahrukh Khan Pathaan Movie : २०१८ मध्ये आलेल्या (Zero) झीरो च्या अपयशानंतर बॉलिवुडचा किंग शाहरुख खान रुपेरी पडद्यापासून दूर होता. शाहरुखच्या चाहत्यांना तर कधी त्याचा सिनेमा येतोय याचीच उत्सुकता लागली आहे. तर 'पठाण' चित्रपटातुन शाहरुख धमाका करण्यास सज्ज झाला आहे. सिनेमाचे टीझर, पोस्टर बघून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे. शाहरुखसाठीही हा चित्रपट खुप खास आहे कारण बऱ्याच काळानंतर तो चाहत्यांच्या भेटीला येतोय. चित्रपटाच्या यशासाठी सध्या शाहरुख अनेक देवस्थळांना भेटी देतोय.

पठाणच्या यशासाठी शाहरुख वैष्णोदेवीच्या दर्शनाला

मध्यंतरी शाहरुख खान सौदी अरेबियाच्या 'मक्का' इथे उमराह करण्यासाठी गेला होता. त्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता तर तो थेट वैष्णोदेवीला पोहोचला आहे. वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेत त्याने पठाण च्या यशासाठी प्रार्थना केली आहे. कडेकोट सुरक्षेसह चेहरा झाकून शाहरुख खान काल रात्री वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. 

'हा शाहरुख खान आहे जो मक्का ला ही जातो आणि वैष्णोदेवी ला ही, सेक्युलर इंडियाचा खरा चेहरा तर हा आहे' अशा शब्दात चाहत्यांनी कौतुक केले आहे. 

सध्या बॉलिवुडमध्ये सिनेमा बॉयकॉट करण्याचा ट्रेंडच आला आहे. कलाकारांची विधानं, चित्रपटाचा विषय अशा अनेक कारणांमुळे सिनेमे बॉयकॉट केले जात आहेत. याचा मोठा फटका आमिर खानला बसल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. या भीतीनेच की काय शाहरुख सध्या देवदर्शन करुन सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करतोय. पठाण नंतर शाहरुखचा 'जवान' हा चित्रपटही रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणजॉन अब्राहम