बॉलिवूडचा किंग अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तो जिथे जाईल तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी होते. त्याच्या 'मन्नत' बंगल्यासमोर तर चाहत्यांची कधीही पाहा गर्दी असतेच. आज पहाटे अबू धाबीला रवाना झाला. तेव्हा मुंबई विमानतळावर चाहत्यांनी त्याला अक्षरश: घेरलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शाहरुख खान आज पहाटेच तो मुंबई विमानतळावर पोहोचला असता चाहत्यांची तुफान गर्दी झाली. तो अक्षरश: चाहत्यांच्या गराड्यात होता. त्याच्यासोबत मॅनेजर पूजा ददलानीही होती. शाहरुखच्या सुरक्षारक्षकांनी त्याला कव्हर केले. मात्र चाहते शाहरुखची झलक पाहण्यासाठी त्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. यामुळे एअरपोर्टवरील सुरक्षारक्षकांनी त्याला सुखरुप आतमध्ये नेले. शाहरुखला पाहून चाहते आरडाओरडाही करत होते. शाहरुखने हुडी, गॉगल आणि कॅप घालून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.
शाहरुख खानचे जगभरात लाखो फॅन्स आहेत. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी चाहते अनेकदा नियंत्रणाबाहेर गर्दी करतात. याचाच प्रत्यय आज विमानतळावर आला. शाहरुख आणि करण जोहर दोघं मिळून यावेळी आयफा पुरस्कार सोहळा होस्ट करणार आहेत. तसंच शाहरुख सध्या 'किंग' सिनेमाचं शूट करत आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत लाडकी लेक सुहानाही असणार आहे.