जूनमध्ये शाहरुख खान काय देणार सरप्राईज?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 09:00 PM2019-04-30T21:00:00+5:302019-04-30T21:00:02+5:30

शाहरुख देखील त्याच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीत खूपच सतर्क असून त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. 

Shahrukh Khan will start his new movie shoot from June | जूनमध्ये शाहरुख खान काय देणार सरप्राईज?

जूनमध्ये शाहरुख खान काय देणार सरप्राईज?

googlenewsNext
ठळक मुद्देजून मध्ये त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल. या चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत असून हा चित्रपट करताना मी आणि माझी टीम कोणतीही चूक करणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.

शाहरुख खानला बॉलिवूडमधील किंग मानले जाते. त्याचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारच असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून शाहरुख खान लागोपाठ फ्लॉप चित्रपट देत आहे. त्यामुळे आता शाहरुख खान कोणत्या चित्रपटात झळकणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. शाहरुख देखील त्याच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीत खूपच सतर्क असून त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. 

शाहरुखने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जून मध्ये त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल. या चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत असून हा चित्रपट करताना मी आणि माझी टीम कोणतीही चूक करणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. आमच्या चित्रपटामुळे प्रेक्षकांची निराशा होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर याविषयी मीडियाशी बोलताना त्याने सांगितले होते की, माझ्या टीमने काही चुका केल्या हे मला मान्य करायला काहीही लाज वाटत नाही. कोणताही चित्रपट हे एक टीमवर्क असते. त्यामुळे मी या अपयशासाठी कोणा एका व्यक्तीला दोष देणार नाही. माझ्या कोणत्या चित्रपटाला अपयश मिळाले तर मला प्रेक्षकांसाठी खूप वाईट वाटते. कारण चांगला चित्रपट पाहायला मिळेल या आशेनेच लोक चित्रपटगृहात आलेले असतात. माझ्या कोणत्याही चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले पाहिजे असे मला वाटते. 

अंधाधुन या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या एका अॅक्शन चित्रपटासाठी शाहरुखला विचारण्यात आले आहे. तसेच मधुर भांडारकरच्या एका कॉमेडी-अॅक्शन चित्रपटाची शाहरुखला ऑफर आली आहे तर एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकसाठी देखील शाहरुखाला विचारण्यात आले आहे. आता या तीन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटावर शाहरुख जूनमध्ये काम करायला सुरुवात करतो की कोणत्या दुसऱ्याच प्रोजेक्टसाठी शाहरुख जूनमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे हे लवकरच कळेल.

Web Title: Shahrukh Khan will start his new movie shoot from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.