Join us

​इतक्या वर्षांत इतकी बदलली शाहरूख खानची ‘ही ’ हिरोईन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 2:21 PM

शाहरूख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातील हिरोईन आठवते? होय, आम्ही बोलतोय ते महिमा चौधरीबद्दल. ‘परदेस’ हा महिमाचा डेब्यू सिनेमा होता ...

शाहरूख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातील हिरोईन आठवते? होय, आम्ही बोलतोय ते महिमा चौधरीबद्दल. ‘परदेस’ हा महिमाचा डेब्यू सिनेमा होता आणि या डेब्यू सिनेमासाठी तिला बेस्ट डेब्यू अवार्ड मिळाला होता. यानंतर महिमा ‘धडकन’ सारख्या हिट चित्रपटातही दिसली होती. हीच महिमा सध्या काय करतेय, काय तुम्हाला ठाऊक आहे. आज आम्ही तेच तुम्हाला सांगणार आहोत. तसा एक प्रश्न तुम्हाला अवश्य पडला असेल तो म्हणजे, अचानक आम्हाला महिमा आठवण्याचे कारण काय? तर कारण आहे, ते म्हणजे महिमाचा लेटेस्ट लूक. होय, बॉलिवूडपासून दूर असलेली महिला अलीकडे एका आर्ट शोमध्ये गेस्ट म्हणून पोहोचली होती.यादरम्यानचे तिचे लूक एकदम वेगळे होते. महिमा या शोमध्ये अभिनेत्री पूजा बेदीसोबत दिसून आली. यावेळी महिमाने शॉर्ट ड्रेस आणि श्रग घातला होता.काही दिवसांपूर्वी महिमाचे काही फोटो व्हायरल झाले होते. ते पाहून महिमाला ओळखणे कठीण झाले होते. कदाचित हेच कारण आहे की, ट्रोलर्सची तोंड बंद करण्यासाठी महिमाने वजन घटवले.  आर्ट शोमधील महिमाला पाहून तरी हेच वाटते. ALSO READ : अखेर ‘त्या’ फोटोबद्दल बोलली महिमा चौधरी  तूर्तास महिमा बॉलिवूडच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये नाही़. महिमा  एक खूप चांगली अभिनेत्री असली तरी ती सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करते. चित्रपटात काम न करण्यामागे एक खास कारण असल्याचे महिमा सांगते. महिमाने अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम केले असले तरी सध्या तिला चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नाहीये. याविषयी महिमा सांगते, अभिनेत्रींचे वय एकदा वाढले की, बॉलिवूडमध्ये त्यांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत असे मला वाटते. त्यामुळे कोणत्याही भूमिका साकारण्यापेक्षा मी चित्रपटांपासून दूर राहाणेच पसंत करते. महिमा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. ‘परदेस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अपूर्व अग्निहोत्री आणि तिच्या अफेअरची चर्चा झाली होती. त्यानंतर लिएंडर पेससोबतचे तिचे प्रेमप्रकरण तर चांगलेच गाजले होते. तिने २००६ला बॉबी मुखर्जी सोबत लग्न केले होते.. बॉबी हा एक व्यवसायिक असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे.