ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यनला आता 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांडवर पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी, ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या संदर्भात, एनसीबी आता शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याचीही झडते घेवू शकतात. जेव्हा जेव्हा आरोपीला अटक होते तेव्हा त्याच्या घराची झडती घेतली जाते. शाहरुख बांद्राच्या बँडस्टँडमध्ये राहतो त्या समुद्रकिनारी असलेल्या बंगल्याची किंमत 200 कोटींपेक्षा जास्त आहे.
शाहरुख खान जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहायलाही जागा नव्हती. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते आणि अभिनेते विवेक वासवानी यांनी शाहरुखला त्यांच्या घरात आश्रय दिला होता आणि शाहरुख बराच काळ त्यांच्या घरी राहात होता. त्यानंतर तो भाड्याच्या घरात राहू लागला.
अभिनय क्षेत्रात सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल करणारा शाहरुख खान आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. त्याच्याकडे 'मन्नत' सारखा आलिशान बंगला आहे. तसे, 'अमृत' हे शाहरुखचे मुंबईतील पहिले घर आहे जिथे तो सुरुवातीला पत्नी गौरीसोबत राहत होता.
शाहरुखने मन्नतला 1995 मध्ये 13.32 कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज त्याची किंमत सुमारे 200 कोटींहून अधिक आहे. संपूर्णपणे पांढऱ्या मार्बलचा वापर करुन बनवलेल्या या बंगल्याला शाहरुखने भाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून भाडेतत्त्वावर घेतला होता. शाहरुख खान पत्नी गौरी आणि तीन मुलांसह 6000 चौरस फूट पसरलेल्या या बंगल्यात आलिशान आयुष्य जगतो. यात पाच बेडरूम आहेत, भली मोठी जिम आणि लायब्ररी आहे. मन्नतमध्ये कुटुंबांसाठी खासगी अपार्टमेंटही आहेत.
शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याचे इंटीरियर त्याची पत्नी गौरी खानने स्वतः डिझाइन केले आहे. गौरीला मन्नतचे इंटिरिअर डिझाईन करण्यासाठी चार वर्षांहून अधिक कालावाधी लागला होता. इंटिरिअर करुन झाल्यानंतर या बंगल्याचे नाव 'मन्नत' असे देण्यात आले. मन्नतला खास डिझाईन करण्यासाठी गौरीनेही प्रचंड मेहनत घेतली आहे.
घराचा दरवाजा उघडताच तुम्हाला क्लासिक बंगला पाहायला मिळतो. हा बंगला एकेकाळी 'व्हिला व्हिएन्ना' म्हणून ओळखला जात होता. या बंगल्याचे मालक किकू गांधी, गुजरातचे पारशी होते, ज्यांचे मुंबईच्या कलाविश्वात मोठे नाव होते.