शाहरुखचा 'रईस' अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2016 2:18 AM
विश्व हिंदू परिषद आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी ‘रईस’च्या शूटींगला विरोध दर्शवला आहे. असहिष्णुतेच्या मुद्दयावर भाष्य केल्यामुळे शाहरुख खानला ‘दिलवाले’च्या ...
विश्व हिंदू परिषद आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी ‘रईस’च्या शूटींगला विरोध दर्शवला आहे. असहिष्णुतेच्या मुद्दयावर भाष्य केल्यामुळे शाहरुख खानला ‘दिलवाले’च्या बॉक्स आॅफिसवरील कमाईत फटका बसला होता. शाहरुखचे ग्रह अजूनही स्थिर झालेले नाहीत. त्याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटालाही आता विरोध सुरू झाला आहे. ‘रईस’ चित्रपटात 1980 चा गुजरात दाखवायचा आहे. त्यासाठी शाहरुख आणि त्याच्या टीमने भूजमध्ये शूटींग करायचे ठरवले आहे. यासाठी शासकीय परवानग्याही त्यांनी घेतल्या आहेत. मात्र गुजरातमध्ये ‘रईस’चे 15 दिवसांचे शूटींग लावण्यात आले आहे. या शूटींगलाच आता विरोध सुरू झाला आहे. पण विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिका-यांना भेटून निवेदन दिले. त्यात ही परवानगी नाकारावी अशी विनंतीही केली आहे. एकंदरीतच असहिष्णुतेच्या संबंधीत भाष्याचा फटका शाहरुखला ‘दिलवाले’मध्ये बसलाच आहे पण आता ‘रईसला’ही हा फटका भसू शकतो असे वातावरण तयार झाले आहे.‘दिलवाले’च्या प्रदर्शनाच्यावेळीही या संघटनांनी विरोध केला होता. शाहरुखचे पोस्टर्स जाळण्यात आली होती.