Join us

​शाहरुख खानच्या ‘रईस’ सोबत दिसणार नाही ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2017 3:09 PM

एस.एस. राजमौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’ या चित्रपटाची शूटिंग समाप्त झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर ...

एस.एस. राजमौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’ या चित्रपटाची शूटिंग समाप्त झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर बाहुबलीचा ट्रेलर शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी दाखविला जाणार असल्याची जोरदार चर्चा झाली. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार होती. मात्र बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी या बातम्यांना खोटे ठरविले असून या केवळ अफवा आहेत असे सांगितले आहे. २०१७ साली प्रदर्शित होणाºया बहुप्रतिक्षत चित्रपटाच्या यादीत ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’चा सामवेश आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास व राणा दुग्गुबाती यांच्यासह अभिनेत्री अनुषा व तमन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर व या चित्रपटाची कथा पूर्ण करण्यासाठी बाहुबलीच्या दुसºया भागाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे सांगताच शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘रईस’ या चित्रपटासोबत ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’चा ट्रेलर रिलीज केला जाईल असे सांगितले होते. मात्र ही केवळ अफवा असल्याचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी ट्विट केले आहे. राजमौली यांनी ट्विटरवर लिहले, ‘बहुबाली २ चे ट्रेलर रईस या चित्रपटासोबत येत असल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्या आहेत. आम्ही सांगू इच्छिती की या बातम्या चुकीच्या असून त्या केवळ अफवा आहेत.’ यानंतर त्यानी आणखी एक ट्विट केले, ते म्हणाले, ‘बाहुबली -२ या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख आम्ही जाहीर करू आणि योग्यवेळी जाहीर करू’राजमौली यांच्या ट्विटमुळे अफवांना विराम मिळाला आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, ‘बाहुबली २’ चा ट्रेलर ‘रईस’ सोबत रिलीज केला जाणार नाही. यामुळे बाहुबलीच्या चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते. शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटाचा २५ जानेवारीला बॉक्स आॅफिसवर आमना सामना होणार आहे. या बॉक्स आॅफिस क्लॅशमध्ये ‘बाहुबली २’चा ट्रेलर रिलीज झाला असता तरी देखील त्याला तेवढी जागा मिळाली नसती हे तेवढेच खरे. बाहुबलीमध्ये आतापर्यंत भारतीय चित्रपटात न  वापरण्यात आलेल्या अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर कळेलच.