Join us

एडिंबरा विद्यापीठात शाहरुख खानचे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM

शाहरुख खानच्या वक्तृत्व कलेविषयी नव्याने सांगायची काही आवश्यकताच नाही. तो भाषण करतो तेव्हा मैदान जिंकलेच म्हणून समजा. तो स्वत:वर ...

शाहरुख खानच्या वक्तृत्व कलेविषयी नव्याने सांगायची काही आवश्यकताच नाही. तो भाषण करतो तेव्हा मैदान जिंकलेच म्हणून समजा. तो स्वत:वर विनोद करू शकतो. स्वत:च्या चुका सांगू शकतो.स्वत:च्या चित्रपटातील गमतीजमती सांगतो आणि ऐकणार्‍याच्या मनावर अधिराज्य गाजवतो. एडिंबरा विद्यापीठात अलीकडेच त्याने केलेले भाषण मनोरंजक तर होतेच प्रेरणादायीसुद्धा होते. त्याच्या या भाषणातील काही विचार तुम्हालाही ऐकायला नक्कीच आवडतील.तुमच्या मनातील भीतीला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका. भीतीतून बाहेर या. विचार करा आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या धैर्यशीलतेचा आणि सार्मथ्याचा परिचय द्या. कलावंतापेक्षा कला ही जास्त महत्त्वाची आहे. चालत राहा. कार्यरत राहा. संभ्रमात असाल, तरी त्यात काही वाईट नाही, जगात यातूनच काही गोष्टी स्पष्ट होत असतात. आजवर जगात झालेले मोठे लोक, सुंदर निर्मिती करणारे लोक, क्रांतिकारक, थोर संशोधक यांच्या यशाचे कारण म्हणजे त्यांचे स्वत:चे विचार आणि स्वत:वरील विश्‍वास.