Join us

आगामी चित्रपटाबाबत शाहरूख ‘कन्फ्युज’; जूनमध्ये करणार चित्रपटाची घोषणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 6:07 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सध्या खूपच कन्फ्युज आहे. शाहरूख आणि कन्फ्युज? कसं काय शक्य आहे? पण, होय हे अगदी खरे आहे. शाहरूख खानचा ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर  फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता त्याचा आगामी चित्रपट कोणता असणार? याबाबत तो फारच साशंक आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सध्या खूपच कन्फ्युज आहे. शाहरूख आणि कन्फ्युज? कसं काय शक्य आहे? पण, होय हे अगदी खरे आहे. शाहरूख खानचा ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर  फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता त्याचा आगामी चित्रपट कोणता असणार? याबाबत तो फारच साशंक आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो जूनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबाबत जाहीर घोषणा करणार आहे तर एका मुलाखतीत तो म्हणतो की, मी कदाचित जूनमध्येही माझा आगामी चित्रपट कोणता असेल? हे चाहत्यांसोबत शेअर करू शकणार नाही. यावरूनच समजतंय की, शाहरूख किती कन्फ्युज आहे ते!

चीन येथे झालेल्या ‘बिजिंग फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘झिरो’ ची स्क्रिनिंग झाली. यावेळी त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला,‘मला असं वाटतं की, मी जूनपर्यंत माझ्या आगामी चित्रपटाबाबत अंतिम निर्णय घेईल.’ त्यानंतर दुसऱ्या एका मुलाखतीत त्याने जूनपर्यंत देण्यात येणारा निर्णय मागे घेतला. तो म्हणाला,‘ माझ्याकडे सध्या कुठलाच प्रोजेक्ट नाही. मी कोणत्याच चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करत नाहीये. साधारणपणे असं होतं की, तुम्ही जेव्हा  एका प्रोजेक्टवर काम करत असता तेव्हा तुमच्या हातात दुसरा प्रोजेक्ट असतो. ३-४ महिन्यात मी पुढच्या प्रोजेक्टमध्ये अंतर्मुख होऊन जातो. मात्र, यावेळेस तसे झालेच नाही. माझे मन मला परवानगीच देत नाहीये. मला असं वाटतं की, मी अजून थोडा वेळ घेतला पाहिजे, काही चित्रपट पाहायला हवेत त्यासोबतच काही पुस्तके वाचली पाहिजेत.’

शाहरूख खानने त्याच्या कुटुंबियांबद्दल बोलताना म्हटले,‘आता माझी मुले ही कॉलेजला आहेत. माझी मुलगी कॉलेजला जाते, मुलाचे शिक्षण पूर्ण होत आहे. अशा वेळेस मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. मी एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी जूनपर्यंत माझा निर्णय घोषित करीन पण, मला वाटत नाही की, मी ते जूनपर्यंत फायनल करू शकेन.  मी आत्तापर्यंत १५-२० स्क्रिप्ट्स वाचल्या आहेत. त्यातील २-३ मला आवडल्या देखील आहेत. पण माझे मनच तयार होत नाहीये.’ 

टॅग्स :शाहरुख खानझिरो सिनेमा