Join us  

​शाहरुखने विचारला सोनमला जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 10:55 AM

इंडस्ट्रीमध्ये बहुधा प्रत्येक अभिनेत्रीला किंग खानसोबत काम करण्याची इच्छा असते. तीन खानसोबत काम करणे म्हणजे बॉलीवूडमध्ये स्थान पक्के केल्यासारखे ...

इंडस्ट्रीमध्ये बहुधा प्रत्येक अभिनेत्रीला किंग खानसोबत काम करण्याची इच्छा असते. तीन खानसोबत काम करणे म्हणजे बॉलीवूडमध्ये स्थान पक्के केल्यासारखे असते. त्यामुळे शाहरुखसोबत काम करण्यासाठी उत्सुक असलेली सोनमही त्याला अपवाद नाही.शाहरुखला कदाचित माझ्यसोबत काम करायचे नाही’ असे तिने एका मुलाखतीमध्ये स्टेटमेंट केले होते. त्यावरून बॉलीवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.सोनमच्या अशा प्रतिक्रियेमुळे शाहरुखलासुद्धा धक्का बसला. तिने असे का म्हटले, याचा जाब विचारण्यासाठी त्याने तिला फोन केल्याचे माहिती मिळतेय. सुत्रांनुसार किंग खानने सोनमची बाजू ऐकून घेतली. तिनेसुद्ध गैरसमज दूर करत सांगितले की, तिला केवळ एवढेच म्हणायचे होते की शाहरुख त्याच्या चित्रपटातील स्टारकास्ट ठरवतो.तसे पाहिले गेले तर सोनम अधूनमधून तिच्या बेताल वक्तव्यांमुळे वाद निर्माण करत असते. परंतु यावेळी तिने प्रथमच शाहरुखवर निशाना साधल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली. एका मुलाखतीत तिने तक्रार बोलून दाखवली होती की, शाहरूख माझ्यासोबत काम करेल, असे मला वाटत नाही.त्याच्याबरोबर काम करण्यासाठी मी प्रयत्नही केलेत. पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. माझे सगळेच प्रयत्न फसले. कदाचित त्याला जेव्हा माझ्यासोबत काम करावेसे वाटेल, तेव्हाच माझी इच्छा होईल. केवळ एवढेच नाही तर यानंतरही सोनम बरेच काही बोलली. बॉलीवूडमध्ये कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायचे हे अभिनेता ठरवतो. त्याच्या आवडीच्याच अभिनेत्रींची चित्रपटात वर्णी लागते. शाहरूखचे म्हणाल तर त्याचेही कदाचित असेच असावे. मला त्याच्यासोबत काम करायचेय. पण कदाचित त्याला ते नको असेल, असेही ती म्हणाली.चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ७ वर्षे होऊनही तिला आपले स्थान कायम करण्यात अपयशच आले. तिच्या नंतर आलेल्या अभिनेत्री - अनुष्का, आलिया - आज खूप पुढे गेलेल्या आहेत. कदाचित करिअरला बुस्ट देण्यासाठी तिला शाहरुखसोबत काम करायचेय.तसे पाहिले तर, अनेक चित्रपटांच्या अपयशानंतर यावर्षी प्रदर्शित ‘नीरजा’मध्ये तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. तिकिट खिडकीवरही तो यशस्वी ठरला.वाचा : ​‘शाहरूख माझ्यासोबत काम करेल, असे वाटत नाही- सोनम