बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस'ला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक हृदयस्पर्शी आणि पडद्यामागील सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो मजा-मस्ती, प्रेम आणि अनेक भावनांनी भरलेला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला शाहरुख खान त्याची को-स्टार दीपिकाला गमतीत 'सिंघम 5' म्हणताना दिसत आहे. शाहरुख खानने ११ वर्षांपूर्वी दीपिका पादुकोणबद्दल गमतीने जे सांगितलं होतं, ते आता खरं ठरत आहे. कारण रोहित शेट्टी 'सिंघम अगेन' हा चित्रपट करत आहे, ज्यामध्ये दीपिका शक्ती शेट्टी नावाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दीपिका पादुकोणने व्हिडीओ शेअर केला आहे. जो चित्रपटाचा BTS व्हिडीओ आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने "हा संवाद मी किती वेळा बोलू? बरोबर उत्तराला 'एक बकवास डिक्शनरी' मिळेल" असं म्हटलं आहे. दीपिकाने चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात मीनम्माची भूमिका साकारली होती.
मीनम्माची भूमिका मजेदार आणि वेगळी होती, दयाळू आणि धाडसी देखील होती. दीपिकाने ही भूमिका तिच्या खास शैलीत चोख बजावली. मीनम्माच्या भूमिकेत दीपिकाचा अभिनय, तिचे अनोखे साउथ इंडियन एक्सेंट, प्रसिद्ध संवाद आणि शाहरुख खानसोबतची तिची उत्कृष्ट केमिस्ट्री आजही प्रसिद्ध आहे.
'सिंघम अगेन' कधी होणार रिलीज?
अजय देवगण, दीपिका पादुकोण, करीना कपूर, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंह यांसारखे कलाकार रोहित शेट्टीच्या आगामी सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट आधी यावर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता पण आता तो दिवाळीला प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याची डेट फिक्स झालेली नाही.