Join us  

'दृश्यम'नंतर येणार 'शैतान', अजय देवगणच्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:33 AM

Shaitan Movie Teaser : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण साऊथची ब्युटी ज्योतिका आणि आर माधवनसोबत 'शैतान' घेऊन आला आहे. या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसत आहे.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण साऊथची ब्युटी ज्योतिका आणि आर माधवन सोबत शैतान घेऊन आला आहे. या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसत आहे. आता या चित्रपटाची पहिली झलक म्हणजेच टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला नेटकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ते या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एवढेच नाही तर २०२४ चा हा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे चाहत्यांनी सांगितले.

अजय देवगणने सोशल मीडियावर शैतानचा टीझर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, तो तुम्हाला विचारेल... हा एक खेळ आहे, तुम्ही खेळाल का? पण त्याला फसवू नका! शैतानचा टीझर आला आहे. हा टीझर शेअर केल्यानंतर एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, शैतान हा टीझर नाही, तो अंगावर काटा आणणारा आहे. आणखी एका युजरने लिहिले, अरे गॉड रेकॉर्ड ब्रेक ब्लॉकबस्टर चित्रपट. तिसऱ्या यूजरने लिहिले, काय टीझर आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचे तर अजय देवगण यावेळी शैतान चित्रपटातून घाबरवताना दिसणार आहे. अलीकडेच त्याने चित्रपटाच्या पोस्टरची झलक दाखवली होती आणि शेअर केले होते की शैतान ८ मार्च, २०२४ मध्ये प्रदर्शित होईल, ज्यामध्ये तो अभिनयासोबत निर्मिती करतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. शैतान व्यतिरिक्त अजय देवगणचा सिंघम अगेन देखील १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :अजय देवगण