अॅडल्ट सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या शकीलाच्या आयुष्यावरील बायोपिकची सध्या चर्चा आहे. शकीलाच्या आयुष्यात आलेले चढउतार दाखवण्यात आले आहे. सिनेमात शकीलाच्या भूमिकेत रिचा चढ्ढा झळकणार आहे.काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरला रसिकांची तुफान पसंती मिळाली होती. ट्रेलर पाठोपाठ या सिनेमाचे पहिले गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे. 'तेरा इश्क सतावे' गाण्याचे बोल असून यात रिचा चढ्ढा घायाळ करणा-या अंदाजात पाहायला मिळत आहे.
खुशबू ग्रेवाल आणि मीत ब्रोसने हे गाणे गायले आहे.कुमार यांनी हे गाणे लिहीले आहे. सिनेमाप्रमाणे हे गाणेही हिंदी, तमिल, तेलुगु, कन्नड़ आणि मलयालम अशा ५ भाषांमध्ये रिलीज केले गेले आहे. सिनेमात नोरोन्हा, राजीव पिल्लई, काजल चुघ, रिचा चढ्ढासह अभिनेता पंकज त्रिपाठीही अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. सिनेमा प्रदर्शनापूर्वीच शकीलाची होणा-या चर्चेमुळे सिनेमा रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. इंद्रजीत लंकेश यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय.
लॉकडाऊनमुळे बंद असलेले थिएटर आता सुरु झाले आहेत. थिएटर सुरु झाल्यानंतर रिलीज होणारा 'शकीला' हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी 'सुरज पे मंगल भारी' आणि 'इंदू की जवानी' हे चित्रपट रिलीज झाले आहेत.‘इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर बिकना होगा या फिर तुझे परदे पर...,’ असे आई शकीलाला म्हणते. आईने दाखवलेल्या वाटेवर चालत शकीला सिनेमात येते आणि सिल्क स्मिताची जागा घेते.
पंकज त्रिपाठी यांची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो, सोबत पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा खडतर प्रवासही दिसतो. हा 3 मिनिटे 39 सेकंदाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा ट्रेलर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा ट्रेलर पाहताना सतत विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’ची आठवण येते. कारण दोन्ही सिनेमे एका समान पार्श्वभूमीवर दोन महिलांवर बनलेले आहेत.