Join us

'बेशरम..!' प्रियंका चोप्रा बिकनीवर टिकली लावलेला फोटो शेअर केल्यामुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 12:29 PM

प्रियंकाचा बिकनीतला फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. कारण यात तिला ओळखणं कठीण झालं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती 'अनफिनिश्ड' या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीनंतर ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. हल्ली ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यातून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये तिने बिकनी टॉपमधील थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. मात्र तिला या फोटोवरून ट्रोल करण्यात आले आहे. 

प्रियंका चोप्राचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हा थ्रोबॅक फोटो खूप जुना आहे. या फोटोत प्रियंका फक्त १९ वर्षांची आहे. तिने व्हाइट बिकनी टॉपसोबत पलाजो परिधान केला आहे. यासोबत तिने कपाळावर बिंदी लावली आहे. हा फोटो पाहून प्रियंकाला ओळखणं कठीण झालं आहे. आता तिच्यात खूप बदल झाला आहे.

प्रियंकाचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. कारण यात तिला ओळखणं कठीण झालं आहे. तिच्या या कपड्यावरून लोकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी तर तिला बेशरमदेखील म्हटले. काहींनी तर हे काय कपडे आहेत? तर काही जणांनी शी! इतकी घाणेरडी यासारखे कमेंट्स तिच्या कपड्यावर केली आहे.

प्रियंका चोप्राने फोटो शेअर करत लिहिले की, शर्मिली, कधी याबद्दल ऐकले नसेल जेव्हा ती १९ वर्षांची होती. या फोटोला १६ लाखांहून जास्त पसंती मिळाली आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. हा फोटो पाहून वाटत आहे की कदाचित तिचा हा फोटो मॉडेलिंगच्या दिवसांतील आहे. यात ती बोल्ड अंदाजात दिसते आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा