Birthday Special : 40 ऑडिशननंतर शर्मन जोशीला मिळाला होता हा लीड रोल, वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:05 AM2020-04-28T11:05:31+5:302020-04-28T11:06:07+5:30

थ्री इडियट्स फेम राजू अर्थात अभिनेता शर्मन जोशी याचा आज वाढदिवस.

sharman joshi birthday special know about actor professional and personal life-ram | Birthday Special : 40 ऑडिशननंतर शर्मन जोशीला मिळाला होता हा लीड रोल, वाचा किस्सा

Birthday Special : 40 ऑडिशननंतर शर्मन जोशीला मिळाला होता हा लीड रोल, वाचा किस्सा

googlenewsNext
ठळक मुद्देशर्मन एका मराठी कुटुंबातील असून त्याचे वडील अरविंद जोशी गुजराती थिएटरचे दिग्गज कलाकार आहेत.

थ्री इडियट्स फेम राजू अर्थात अभिनेता शर्मन जोशी याचा आज वाढदिवस. गुजराती रंगभूमीवरून करिअरची सुरुवात करणा-या शर्मनने ‘गॉडमदर’ या सिनेमातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘स्टाईल’ या सिनेमाने. यानंतर ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट्स’ या आमिर खानसोबतच्या सिनेमामुळे तो चर्चेत आला. यानंतर शर्मन ब-याच सुपरहिट सिनेमांत दिसला. त्याच्या कॉमेडीवर लोक फिदा आहेत. पण करिअरच्या सुरुवातीला चित्र थोडे वेगळे होते.

होय, शर्मनचा कॉमिक टायमिंग बराच खराब होता. खुद्द शर्मनने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आधी माझा कॉमिक टायपिंग फार खराब होता. यावरून मला खूप टीकाही सहन करावी लागली. पण काम करत गेलो आणि माझ्यात सुधारणा होत गेली.

फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, ‘फेरारी की सवारी’ या सिनेमासाठी शर्मनने एकदा, दोनदा नाही तर तब्बल 40 वेळा ऑडिशन दिले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा होते. यांच्यासोबत शर्मनने थ्री इडियट्समध्येही काम केले होते. पण  ‘फेरारी की सवारी’साठी शर्मनला बराच घाम गाळावा लागला. या चित्रपटातील लीड रोल मिळवण्यासाठी त्याने 40 वेळा ऑडिशन दिले होते.

शर्मन एका मराठी कुटुंबातील असून त्याचे वडील अरविंद जोशी गुजराती थिएटरचे दिग्गज कलाकार आहेत. शिवाय त्याच्या या कुटुंबातील इतर सदस्य सुध्दा थिएटरशी जुळलेले आहेत. शर्मनला स्वत:ला थिएटरमध्ये काम करण्याची आवड आहे.


 
 शर्मनची पत्नी ही एका प्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे़ होय, शर्मनची पत्नी प्रेरणा ही प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे.
 शर्मन पत्नी प्रेरणा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात दिसतो़ प्रेरणा आणि शर्मन यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. काहीच दिवसांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरं तर लग्नाच्या आधी कित्येक महिने ते दोघे नात्यात होते. पण त्या दोघांमध्ये कोणीच कोणाला प्रपोज केले नव्हते असे शर्मनने एका मुलाखतीत सांगितले होते. 15 जून 2000 ला त्या दोघांचे मुंबईत धुमधडाक्यात लग्न झाले. त्यांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले आहेत.

Web Title: sharman joshi birthday special know about actor professional and personal life-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.