रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटल्यानंतर तो पैसा वसूल ठरतो़ रोहितच्या चित्रपटांनी अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या ‘गोलमाल’ सीरिजला तर लोकांनी डोक्यावर घेतले. आता ‘गोलमाल’ सीरिजबदद्ल एक बातमी समोर आली आहे. होय, या सीरिजचा पहिला चित्रपट ‘गोलमाल- फन अनलिमिटेड’मध्ये अभिनेता शरमन जोशी महत्त्वपूर्ण भूमिकेत होता, हे तुम्ही जाणताच. पण यानंतरच्या दुसऱ्या पार्टमध्ये मात्र शरमनला डच्चू मिळाला. या दुसºया पार्टमध्ये अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर यांच्यासोबत श्रेयस तळपदेची वर्णी लागली. शरमनच्या जागी अचानक श्रेयसची वर्णी का लागावी, असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. त्यावेळी यावर बरीच चर्चा झाली होती. काहींच्या मते, शरमनने फी वाढवली होती तर काहींच्या मते, या पार्टमध्ये शरमनची गरज नव्हती. पण आता शरमनला का डच्चू मिळाला, याचे खरे कारण समोर आले आहे. खुद्द शरमनने ‘काशी’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये याबद्दल खुलासा केला आहे. होय, माझ्या फी वाढवण्यावरून माझा मॅनेजर आणि चित्रपटाचा निर्माता यांच्यात काही वाद झाला होता. माझा मॅनेजर चर्चा करत होता. काही इशो प्रॉब्लम होता. सरतेशेवटी मला या चित्रपटातून काढले गेले. त्यापूर्वी मी निर्मात्याला जावून हा चित्रपट मिळण्यासाठी बरीच विनंती केली होती. मला हा चित्रपट करायचा होता. मी निर्मात्याची बरीच मनधरणी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, असे शरमन म्हणाला.यामागे रोहित शेट्टी व अजय देवगणचा हात होता का? असे विचारले असता कुणाचा हात होता मला ठाऊक नाही. कदाचित यामागे निर्मात्यांचा हात होता. माझी फी वाढवण्यास त्यांनी नकार दिला होता, असे शरमन म्हणाला.
- म्हणून ‘गोलमाल’ सीरिजमधून शरमन जोशीला मिळाला होता डच्चू! १० वर्षांनंतर झाला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 3:51 PM