Join us

-तर हा अभिनेता ठोकणार बॉलिवूडला रामराम, गावात जाऊन करणार शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 2:31 PM

धक्कादायक खुलासा!!

ठळक मुद्दे‘बबलू बॅचलर’ हा सिनेमा येत्या 20 मार्चला रिलीज होतोय.

रंग दे बसंती,स्टाईल, गोलमाल, 3 थ्री इडियटस, फेरारी की सवारी  अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशी एक हरहुन्नरी अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांत शर्मनचे अनेक सोलो सिनेमे प्रदर्शित झालेत. पण बॉक्स आॅफिसवर त्याच्या या सोलो चित्रपटांनी निराशा केली. लवकरच शर्मनचा ‘बबलू बॅचलर’ हा सिनेमा रिलीज होतोय. पण त्याआधी शर्मनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, ‘बबलू बॅचलर’ अपयशी ठरलाच तर आपण बॉलिवूड सोडून गावात जाऊन शेती करू, असा पक्का इरादा त्याने बोलून दाखवला आहे.

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शर्मनने हा खुलासा केला. तुझ्या सोलो सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, तेव्हा नेमके काय विचार मनात येतात? असा सवाल शर्मनला यावेळी केला गेला. यावर शर्मन जे काही बोलला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तो म्हणाला, ‘माझा सिनेमा आपटला की, बॉलिवूड सोडून गावात परतण्याचा विचार माझ्या मनात येतो. गावात स्थायिक होऊन मस्तपैकी शेती करावी. कुटुंबासोबत शांत आयुष्श घालवावे आणि स्वत:च्या आतल्या कलाकाराला शांत करण्यासाठी कधी कधी नाटक करावे, असे मला वाटते.’

‘मिशन मंगल’ हा सिनेमा येण्यापूर्वीच गावात स्थायिक होण्याच्या विचारात मी होतो. पण ‘मिशन मंगल’चालला आणि माझा प्लान मी पुढे ढकलला. पण आता ‘बबलू बॅचलर’ चालला नाही तर मी गावात जाऊन तिथेच स्थायिक होईल, असेही तो म्हणाला. मी गंमत करत नसून गंभीर आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

‘बबलू बॅचलर’ हा सिनेमा येत्या 20 मार्चला रिलीज होतोय. यात शर्मनसोबत पूजा चोप्रा, राजेश शर्मा मुख्य भूमिकेत आहे.  

टॅग्स :शरमन जोशी