Join us

सारा अली खानच्या चित्रपटांपेक्षा तिच्या 'ह्या' गोष्टीवर इम्प्रेस आहेत शर्मिला टागोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 7:22 PM

अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे आतापर्यंत दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. त्यात आता तिची आजी शर्मिली टागोर यांनी देखील तिचे कौतूक केले आहे.

ठळक मुद्देसारा दिल्लीत कार्तिक आर्यनसोबत 'लव आज कल २'चे चित्रीकरण करत आहे

अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे आतापर्यंत दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. त्यात आता तिची आजी शर्मिली टागोर यांनी देखील तिचे कौतूक केले आहे. त्या आपल्या नातीची विनम्रता, खरेपणा व कामाप्रती निष्ठा पाहून खूप खूश आहेत.

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नात सारा अली खानचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले व तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या मुलाखती जास्त भावत असल्याचे त्या म्हणाल्या.

शर्मिला टागोर यांनी सांगितले की,' साराचा विनम्र स्वभाव व मुलाखतीत बोलण्याची पद्धत पाहून मी प्रभावित झाले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. पण तिच्या मुलाखती पाहिल्यावर समजते की ती किती नम्र, सभ्य व समजूतदार आहे. ती माझी नात असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.'

दरम्यान स्वत:चे आत्मचरित्र लिहिण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 'जर कोणा निर्मात्याला त्यावर भविष्यात चित्रपट तयार करायचा असेल तर माझी हरकत नाही.' यावेळी त्यांना बायोपिकमधील त्यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री सारा आली खानचे नाव सुचवण्यात आले. त्यावर त्यांनी  बायोपिकमध्ये माझी भूमिका साराने केली तर मला नक्कीच आवडेल असे सांगितले.

सध्या सारा दिल्लीत कार्तिक आर्यनसोबत 'लव आज कल २'चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहे. साराने २०१८ साली 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याच वर्षी तिचा दुसरा चित्रपट सिम्बा प्रदर्शित झाला. यात तिच्यासोबत रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती.

टॅग्स :शर्मिला टागोरसारा अली खान