कश्मीर की कली, वक्त, आमने सामने असे शानदार सिनेमे देणाऱ्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore ) यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटातून अॅक्टिंगला सुरुवात केली. 1964 साली त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव होतं ‘कश्मीर की कली’. या चित्रपटानं शर्मिला यांना एक वेगळी ओळख दिली. पण यानंतर ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात शर्मिला यांनी एक बिकिनी सीन दिला आणि त्यांच्या या सीनने खळबळ माजली. देशाच्या संसदेतही हा मुद्दा गाजला होता. मॉडर्न विचारांच्या शर्मिला टागोर तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा ॲक्टिंगच्या दुनियेत वापसी करत आहेत. यानिमित्ताने शर्मिलांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या भरभरून बोलल्या. मुलगा सैफ अली खानच्या लग्नानंतर शर्मिला एकट्या वेगळ्या राहतात. यामागचं कारणही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, “आयुष्यात सगळ्यात गोष्टी एकत्र करता येत नाहीत. अनेकदा यामुळे दु:खही होतं. एक काळ असा होता की मुलं आईशिवाय काहीच करू शकत नव्हते. पण आता मुलांजवळ त्यांचा जोडीदार आहे. त्यांची स्वत:ची मुलं आहेत. अशावेळी त्यांचं प्रेम हे विभागलं जाणं स्वाभाविक आहे. आई कुठेच जात नाही. यामुळेच अनेकदा आईला गृहित धरलं जातं. मला वाटतं, याचा परिणाम तुमच्यावर होता कामा नये. कारण हा मानवी स्वभाव आहे. माझ्याबाबतीतही कधीकाळी हेच घडलं होतं. माझं लग्न झाल्यानंतर माझंही माझ्या पालकांवरचं प्रेम विभागलं गेलं होतं. त्यांच्यावरचं लक्ष कमी झालं होतं. माझी मुलं सेटल झाली आहे. तेू आनंदात आहेत. त्यांना आनंदी बघून मी सुद्धा आनंदी होते.”
सैफ व करिनाच्या लग्नानंतर शर्मिला त्यांच्यापासून वेगळ्या राहत असल्या तरी, त्यांचं कुटुंबासोबत खूप चांगलं नातं आहे. सून करिनासोबतही त्यांचा चांगला बॉन्ड आहे. अनेक कौटुंबिक कार्यक्रमात शर्मिला आनंदाने सहभागी होतात. नातवंडांसोबत धम्माल करतात.
‘गुलमोहर’ या चित्रपटातून शर्मिला कमबॅक करत आहेत. या चित्रपटात मनोज वाजपेयी, अमोल पालेकर, सूरज शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या ३ मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय.