Join us

पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच 'या' अभिनेत्रीला लागली लॉटरी, मोठ्या ब्रँड्सचीही बनली चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 5:15 PM

शर्वरी वाघ आपला सुंदर चेहरा आणि अभिनयगुणांच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी स्टार ठरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

'बंटी और बबली 2'मधून पदार्पण करणाऱ्या शर्वरीने काही खरोखर मोठ्या ब्रॅण्ड्सचे लक्ष वेधून घेतले आहे. म्हणूनच पॉण्ड्सचा नवा चेहरा म्हणून तिची निवड झाली आहे. हा करार तिचा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झाल्यामुळे कराराची घोषणा खरोखर महत्त्वाची आहे आणि एक आगामी स्टार चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे हे यातून स्पष्ट होत आहे.शर्वरी आपला  सुंदर चेहरा आणि अभिनयगुणांच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी स्टार ठरणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 

एक ब्रॅण्ड इक्विटी पंडित सांगतात, “पॉण्ड्ससारख्या मोठ्या ब्रॅण्डने शर्वरीसारख्या नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला यातूनच शर्वरीची क्षमता दिसून येते.

ती सध्या वायआरएफच्या छत्रछायेत आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे, तरीही पॉण्ड्ससारखा ब्रॅण्ड नेहमीच कलाकाराशी करार करण्यापूर्वी, त्याचे किंवा तिचे गुण आणि दीर्घकाळात स्वत:ला सिद्ध करण्याची पात्रता, यांचा विचार करतो. शर्वरीने हे सगळे निकष पूर्ण केले आहेत. नजीकच्या भविष्यकाळात शर्वरीकडे सर्वांचे लक्ष असेल याचा हा संकेत आहे. शर्वरीकडे आता मोठ्या फिल्म्स आणि मोठा ब्रॅण्ड आहे. याचा अर्थ ती या क्षेत्रावर आपला ठसा नक्की उमटवणार.”

शर्वरीने आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्सशी तीन फिल्म्ससाठी करार केला आहे आणि तिने वायआरएफ बॅनरखाली आणखी एक मोठी फिल्म साइनही केली आहे. या फिल्मची घोषणा अद्याप झालेली नाही. या क्षेत्रातील स्रोत सांगतो, “आदित्यला शर्वरीकडून प्रचंड अपेक्षा आहेत. तिने कबीर खानच्या 'द फरगॉट्न आर्मी’मध्ये चांगलीच चमक दाखवली आहे. ही डिजिटल मिनीसीरिज आल्यानंतर शर्वरी चर्चेचा विषय झाली होती. शर्वरीची गणना पुढील पिढीमधील सर्वांत मोठ्या स्टार्समध्ये व्हावी म्हणून आदी तिला काळजीपूर्वक ग्रूम करत आहे. 

वायआरएफला शर्वरीच्या भरवशावर मोठ्या खेळी खेळायच्या आहेत आणि तिच्याबाबत त्यांना किरकोळ गोष्टी नकोच आहेत हे पॉण्ड्सशी झालेल्या करारासारख्या कृतींतून स्पष्ट दिसून येत आहे. शर्वरीसारख्या प्रतिभावंत नवोदितांचा या क्षेत्रात प्रवेश होणे खूपच चांगले आहे, कारण, आज हे क्षेत्र प्रतिभेवर चालत आहे. फिल्म इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, ती आपल्या पहिल्याच फिल्मपासून चमकदार यश मिळवू शकते.