Join us

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नातीची किती होती पहिली कमाई? शर्वरी वाघने स्वतः दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:03 IST

शर्वरी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. एकामोगामाग एक असे हीट चित्रपट ती देत आहेत.

Sharvari Wagh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ सध्या चर्चेत आहे. शर्वरी वाघचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. तिचे चाहते तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात.  दिवसेंदिवस शर्वरी वाघ ही यशाचं शिखर गाठत आहे. शर्वरी वाघ आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारते. पण शर्वरीची पहिली कमाई किती होती, हे तुम्हाला माहितेय का ? खुद्द शर्वरी हिनेच याचा खुलासा केला होता. विशेष म्हणजे पहिल्या पगाराचा चेक हातात येताच शर्वरी वाघने काय केलं होतं, हे आपण जाणून घेऊया. 

शर्वरीने नुकतंच Mashable India ला मुलाखत दिली. यावेळी शर्वरीने पहिल्या पगाराबद्दल सांगितलं. शर्वरीने 'प्यार का पंचनामा २' साठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. यासाठी तिला चेक मिळाला होता. तिला सात हजार पाचशे रुपये मिळाले होते. यासाठी तिने एक महिना काम केलं केल्याचं सांगितलं. ती म्हणाली, " मला आठवते जेव्हा मला माझा पहिला चेक मिळाला होता. तेव्हा माझ्या पालकांनी तो चेक फ्रेम करुन घेतला. त्यावर त्यांनी एक गोड नोट लिहिली. तो फ्रेम केलेला चेक केवळ आर्थिक यशाचे प्रतीक नाही. तर कुटुंबाच्या पाठिंब्याचं आणि माझ्या कर्तृत्वावर त्यांना असलेल्या अभिमानाचा दाखला आहे".

शर्वरी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. एकामोगामाग एक असे हीट चित्रपट ती देत आहेत. नुकतंच तिचा हॉरर कॉमेडी सिनेमा 'मुंज्या' चांगलाच गाजला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.  यामध्ये ती 'बेला' या भूमिकेत दिसली होती. तर अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'महाराज'मध्ये तिने विशेष भूमिका साकारली आहे. या सिनेमात ती आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत झळकली होती.

याशिवाय, शर्वरी ही जॉन अब्राहमसोबत वेदा या सिनेमातदेखील पाहायला मिळाली. खऱ्या घटनांपासून प्रेरित हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने जगभरात फक्त २३ कोटींची कमाई केली. तर शर्वरीच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं शर्वरी ही स्पाय युनिव्हर्सचा एक भाग होणार आहे. शर्वरी वाघ यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटात आलिया भटसोबत झळकणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा