Join us

शर्वरीच्या 'मुंज्या'चे 'बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन'सोबत आहे कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 5:02 PM

शर्वरी वाघ(Sharvari Wagh)चा नुकताच 'मुंज्या' (Munjya Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील आपल्या अभिनयाने आणि डान्स नंबर ‘तरस’मधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

शर्वरी वाघ(Sharvari Wagh)चा नुकताच 'मुंज्या' (Munjya Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील आपल्या अभिनयाने आणि डान्स नंबर ‘तरस’मधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता भारतातील दुसरी सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून तिची निवड करण्यात आली आहे. कारण ‘मुंज्या’ एक ब्लॉकबस्टर यशाची कहाणी बनला आहे! ‘मुंज्या’चे ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’, ‘जस्टिस लीग’ सारख्या एपिक सुपरहीरो चित्रपटांसोबत एक मोठ कनेक्शन आहे.

‘मुंज्या’ एका महाराष्ट्रीयन लोककथेवर आधारित आहे आणि चित्रपटातील भूत एक अविश्वसनीयरित्या डिझाइन केलेले CGI पात्र आहे ज्याने प्रेक्षकांना पूर्णपणे प्रभावित केले आहे. CGI पात्र ब्रॅड मिनिचच्या अध्यक्षतेखालील जगातील अग्रगण्य हॉलिवुड VFX कंपन्यांपैकी एक DNEG ने तयार केले आहे. त्यांनी यापूर्वी वरील उल्लेखित मोठ्या हॉलीवुड हिट चित्रपटांवर काम केले आहे.

...तेव्हा मी थक्क झाले

शर्वरी म्हणाली , “माझे निर्माते दिनेश विजान आणि माझे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ‘मुंज्या’च्या माध्यमातून एक अनोखा नाट्यमय अनुभव देण्याचा मोठा उद्दिष्ट होते. त्यांना स्पष्ट होते की CGI पात्राने प्रेक्षकांवर प्रभाव टाकावा लागेल आणि दिनेश सरांनी त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्तता करण्यासाठी सर्वोत्कृष्ट VFX कंपनीची निवड केली. जेव्हा मी चित्रपटात CGI पात्र पहिले, तेव्हा मी थक्क झाले आणि प्रेक्षकांनाही तसंच वाटतंय, त्यामुळेच आमचा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.”

हा पूर्णतः समृद्ध अनुभव होता

ती पुढे सांगते, “चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, आमच्याकडे फक्त याचा संदर्भ होता की CGI पात्र कसे असेल, पण जेव्हा मी अंतिम रूप पाहिले, तेव्हा तो एक अविश्वसनीय अनुभव होता. या पात्राने लोकांच्या हृदयाला स्पर्श केल आहे. ब्रॅड मिनिच यांनी एक अपवादात्मक काम केले आहे आणि मला माझ्या करियरच्या या टप्प्यावर त्यांच्यासोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी खूप भाग्यवान आहे. हा पूर्णतः समृद्ध अनुभव होता.”

शर्वरी म्हणाली की, “ब्रॅड दररोज सेटवर असायचे आणि ते आदित्य सरांसोबत सविस्तर चर्चा करायचे. त्यांची चर्चा ऐकणे आणि जितके शक्य होईल तितके आत्मसात करणे मला खरोखरच आवडले. यामुळे मला मुंज्या पात्राला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली.” मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे आणि मंगळवारी ६४.७५ कोटींचं कलेक्शन केले आहे.