Join us

गोविंदाची भेट घेतल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ही दुर्घटना कशी घडली याचं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:48 IST

अनेक सेलिब्रिटींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन गोविंदाची विचारपूस केली.

अभिनेता गोविंदाच्या (Govinda) पायाला काल गोळी लागली. या घटनेमुळे सर्वच हादरले. काल पहाटे गोविंदा कोलकत्याला निघणार होता. त्याच्याकडे परवाना असलेली बंदूक तो कपाटातून काढत होता तेव्हा ती चुकून खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलंच असल्याने गोळी झाडली गेली आणि ती गोविंदाच्या पायाला लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी गोळी काढली. अनेक सेलिब्रिटींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन गोविंदाची विचारपूस केली. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही गोविंदाची भेट घेऊन आल्यावर प्रतिक्रिया दिली.

गोळी लागल्यानंतर गोविंदाला अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेव्हिड धवन, जॅकी भगनानी, कश्मिरा शाह, शत्रुघ्न सिन्हा यांनी गोविंदाची भेट घेतली. बाहेर आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी माध्यमांना गोविंदाच्या तब्येतीतबाबत अपडेट दिले. ते म्हणाले, "गोविंदाची तब्येत आता स्थिर आहे. सुधारणार आहे. सगळ्यांशी छान बोलत आहेत. त्यांना भूल दिली होती त्याचा परिणाम आता कमी झाला आहे. ही एक दुर्घटना होती. हे कसं झालं, का झालं याचं काहीही कारण नसतं. ते आता एकदम ठीक आहेत. दोन दिवसात त्यांना घरीही सोडण्यात येईल."

गोविंदाने काल स्वत: हॉस्पिटलमधून थरथरत्या आवाज ऑडिओ क्लिप शेअर करत आता आपण  बरे असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे, गुरुंच्या कृपेमुळे आपण एकदम ठणठणीत असल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन करुन गोविंदाच्या तब्येतीबाबत विचारपूस केली होती. 

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हागोविंदाहॉस्पिटलमुंबई