शत्रुघ्न सिन्हांची इच्छा, माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ दोन अभिनेत्यापैकी एकाने माझी भूमिका करावी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 3:28 PM
सध्या बॉलिवूडमध्ये दिग्गजांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्याचा ट्रेंड सुरू आहे. विशेष म्हणजे या बायोपिकला प्रेक्षकांकडून पसंती मिळत असल्याने, ...
सध्या बॉलिवूडमध्ये दिग्गजांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्याचा ट्रेंड सुरू आहे. विशेष म्हणजे या बायोपिकला प्रेक्षकांकडून पसंती मिळत असल्याने, आगामी काळात आणखीही प्रभावी बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतात. सध्या अभिनेते तथा राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची चर्चा रंगत आहे. अशात शत्रुघ्न सिन्हा यांनी एक विधान केल्याने त्यास बळकटी दिली आहे. त्यांंनी म्हटले की, जर माझ्यावरील बायोपिकची निर्मिती केली तर त्यामध्ये माझी भूमिका रणबीर कपूर किंवा रणवीर सिंगने करावी. शत्रुघ्न सिन्हा असे व्यक्ती आहेत, ज्यांना इंडस्ट्री आणि या देशाने भरभरून प्रेम दिले. त्यांच्या जीवनात एवढे चढउतार आले की, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधून अशी बातमी समोर येत आहे की, लवकरच त्यांच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र प्रश्न हा आहे की, बॉलिवूडमध्ये असा कोणता अभिनेता आहे, जो त्यांची भूमिका साकारू शकेल? जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटले की, रणबीर कपूर आणि रणवीर सिंगसारखे सर्व नवे कलाकार चांगले काम करीत आहेत. आमच्या काळात गोविंदा आणि अनिल कपूर यांनीही चांगले काम केले. शिवाय अमिताभ बच्चन अजूनही चांगले काम करीत आहेत. अशात माझी भूमिका कोणी साकारावी असा प्रश्न जर उपस्थित केला जात असेल तर मला असे वाटते की, रणबीर कपूर किंवा रणवीर सिंग या दोघांपैकी एक मला पडद्यावर चांगल्या पद्धतीने साकारू शकेल. शत्रुघ्न सिन्हा जरी इंडस्ट्रीमधून गायब होऊन राजकारणात सक्रिय झाले असले तरी, त्यांचा प्रभाव तसूभरही कमी झालेला नाही. आजही बरेचसे कॉमेडी कलाकार आहेत, जे शत्रुघ्न सिन्हा यांची अॅक्टिंग करून पोट भरत आहेत. त्यांच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, शत्रुजी यांनी इंडस्ट्रीत खलनायक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. मात्र हळूहळू त्यांनी अभिनेता म्हणून नशीब आजमावले. पुढे प्रेक्षकांनीदेखील त्यांना खलनायक नव्हे तर नायक म्हणून स्वीकारले. इंडस्ट्रीत त्यांना बिहारी बाबू म्हणून ओळखले जात होते. अभिनयाव्यतिरिक्त राजकारणातही त्यांचा प्रभाव आहे. सध्या ते भाजपाचे खासदार असून, पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहेत. मात्र अशातही शत्रुजी म्हणतात की, जर मला माझ्या वयानुसार, प्रतिष्ठेनुसार भूमिका मिळाली तर ती नक्कीच करणार.