Join us

ऐश्वर्या इतकीच सुंदर असूनही सलमानची ही अॅक्ट्रेस आहे इंडस्ट्रीतून गायब, कारणही आहे धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 6:00 AM

जेव्हा 'लकी' सिनेमा आला तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती. याच काळात सिनेमामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले होते.पण शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केले.

'लकी' सिनेमातून सलमाननेच तिला लॉन्च केले होते. सलमान खानची साथ लाभल्यानंतरही स्नेहा उलाल हवे तसे यश मिळाले नाही. अखेरची 2015 मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात झळकली होती. मात्र त्यानंतर सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली .स्नेहाने तीन वर्षे एका गंभीर आजाराशी लढा दिला.एका मुलाखतीत स्नेहाने सांगितले होते की, ती ऑटोइम्यून डिसऑर्डरने पीडित असून हा आजार रक्ताशी संबंधित असतो. या आजारामुळे ती अतिशय अशक्त झाली होती, ती अर्धा तासदेखील स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती.

या आजारामुळे ती दीर्घकाळ सिनेमांपासून दूर राहिली.  शूटिंगपासून ब्रेक घेऊन योग्य उपचार करायचे ठरवले. कारण काम करत असताना दर दुस-या दिवशी ती आजारी पडायची.त्यामुळे आरोग्यावर लक्ष केंद्रित केले, योग्य उपचार केले आणि आता स्नेहा ठणठणीत बरी झाली आहे. मात्र आजही फारसं अस्तित्त्व सिनेमात जाणवत नाही. आता स्नेहा उलालला सिनेमाच्या ऑफर्सही मिळण्या बंद झाल्या आहेत.

दरम्यान मध्यंतरी दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, स्नेहाने सांगितले, जेव्हा 'लकी' सिनेमा आला तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती. याच काळात सिनेमामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले होते.पण शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मी साऊथमध्ये बिझी झाले. तेथे काम जास्त होते. त्यामुळे बॉलिवूडपासून दूर राहणेच पसंत केले.

स्नेहाने सलमानसोबत 'लकी' ) या सिनेमाद्वारे डेब्यू केला होता. या सिनेमानंतर मात्र ती सलमानसोबत झळकली नाही.  स्नेहाने 'लकी...'नंतर 'आर्यन'  'जाने भी दो यारों'  'काश मेरे होते'(2009), आणि 'क्लिक'  आणि 'बेजुबान इश्क' या बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला.

2008 साली तेलगू सिनेमाद्वारे स्नेहाने साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर ती तेलगूशिवाय कन्नड, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये तिने काम केले आहे. 

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन