Join us

कठीणसमयी ‘चांदनी’च्या लेकींना तिने दिला धीर,श्रीदेवी यांच्या इच्छेनुसार केली अंत्यदर्शनासाठी तिने तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 5:59 AM

हिंदी चित्रपटसृष्टीची ‘चांदनी’च्या आकस्मिक जुदाईने सा-यांनाच सदमा लागला आहे.अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. मग रसिक असो ...

हिंदी चित्रपटसृष्टीची ‘चांदनी’च्या आकस्मिक जुदाईने सा-यांनाच सदमा लागला आहे.अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. मग रसिक असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकालाच ‘हवाहवाई’ श्रीदेवी यांच्या जाण्याने धक्का बसला आहे.हा क्षण तमाम कपूर कुटुंबीयांसाठी जणू काही परीक्षेचा काळच आहे.श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर हे त्यावेळी तिथेच होते.त्यामुळे बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या निधनामुळे फार मोठा धक्का बसला आहे.मात्र श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांच्या दोन लेकी पूर्णता कोसळून गेल्यात.चांदनीचं आपल्या लेकींवर जीवापाड प्रेम होतं.आईच्या अकाली जाण्याने जान्हवी आणि खुशी या दोन्ही लेकींवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय.जान्हवीचा पहिला सिनेमा काही महिन्यातच रिलीज होत असल्याने श्रीदेवी खूप एक्साईटेड होत्या.मात्र आपल्या लाडक्या जानूचा हा सिनेमा रिलीज होण्याआधीच चांदनी कायमची निघून गेलीय. त्यामुळे हा धक्का पचवणं जान्हवी आणि खुशीला कठीण जातंय.आईच्या आठवणी आणि ते क्षण त्यांच्या मनात दाटून येतायत.या कठीणप्रसंगी या दोन्ही लेकींना सांभाळण्यासाठी एक व्यक्ती पुढे सरसावलीय.ही व्यक्ती कपूर कुटुंबातील सदस्य आहे.ही व्यक्ती म्हणजे अभिनेता अनिल कपूर यांची पत्नी,सोनम कपूरची आई सुनीता कपूर.मुळात काकीचं नातं असलेल्या सुनीता कपूर यांनी जान्हवी आणि खुशीला आधार दिला. श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबईत येईपर्यंत दोन्ही लेकी अनिल कपूर यांच्या घरीच होत्या.आईच्या आठवणीने दोन्ही लेकींचा अश्रूंचा बांध फुटायचा. त्यावेळी सुनीता कपूर यांनाही अश्रू अनावर होत.मात्र स्वतःला सावरत त्यांनी जान्हवी आणि खुशीला धीर दिला.आईची कमी जाणवू नये यासाठी स्वतःचे अश्रू लपवत सुनीता यांनी या दोघींना जवळ घेऊन मिठी मारली.यासोबतच कपूर घराण्यातील सगळी पुरुष मंडळी श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्याच्या गडबडीत होते त्यावेळी सुनीता कपूर यांनी श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठीच्या तयारीची व्यवस्था कशी असेल याचीही काळजी घेतली.श्रीदेवी यांच्या प्रत्येक आवडीनिवडी सुनीता यांना माहिती होत्या.त्यामुळे श्रीदेवी यांच्या आवडीच्या पांढ-या रंगानुसार अंत्यदर्शनाची सगळी तयारी सुनीता यांनी केली.श्रीदेवी यांना मोग-याची पांढरी फुलं आवडायची.त्या फुलांनी सगळा सेलिब्रेशन हॉल सजवण्यात आला आहे.ही तयारीसुद्धा सुनीता कपूर यांच्या सांगण्यानुसार करण्यात आल्याचे बोललं जातंय.