Join us  

"ती माझ्या खूप जवळ आहे", जेव्हा प्रियंका चोप्रासोबत नाव जोडल्यामुळे शाहरूख खानने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:04 AM

Shah Rukh Khan And Priyanka Chopra : शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख(Shah Rukh Khan)चं सिनेकारकीर्द खूप चांगलं राहिलं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत तीन दशक अभिनेता लोकांचे मनोरंजन करतो आहे. त्याचे फॅन्स फक्त भारतातच नाही तर देशभरात आहेत. शाहरूख खान जितका प्रोफेशन लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येतो. एकदा शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)च्या अफेयरच्या चर्चांनी जोर धरला होता. लोकांचं म्हणणं होतं की, ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा किंग खान विवाहित होता. प्रियंकासोबतच्या अफेयरच्या चर्चेवर शाहरूख खानने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. 

अभिनेता शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्रासोबत नाव जोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. प्रियंका चोप्रासोबतच्या अफेअरच्या अफवांवर शाहरुख खान म्हणाला होता, 'मला वाईट वाटतं की माझ्यासोबत असलेल्या महिलांना मी देतो तसा आदर दिला जात नाही. मी माफी मागतो, मी काही केले म्हणून नाही तर ती माझी मैत्रीण आहे म्हणून. म्हणूनच मला ते खूप अपमानास्पद वाटले. ती माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणींपैकी एक आहे आणि माझ्या खूप जवळ आहे आणि नेहमीच असेल. आम्ही मित्र म्हणून पडद्यावर खूप छान वेळ घालवला आहे. मैत्री बिघडते हे दुर्दैव आहे.

गौरी खानने शाहरुखला दिली होती ही ताकीदशाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. यानंतर शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. प्रियांका चोप्रासोबतच्या अफेअरमुळे शाहरुख खानचे घर उद्धवस्त होणार होते, असेही म्हटले जाते. गौरी खानने पती शाहरुख खानला प्रियंका चोप्रासोबत काम न करण्याची ताकीद दिली होती.

टॅग्स :शाहरुख खानप्रियंका चोप्रा