अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर 20 जुलैला रिलीज होणाऱ्या 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. धडक हा 2016मध्ये आलेल्या मराठी सिनेमा सैराटचा रिमेक आहे. यात जान्हवी आणि ईशानची मुख्य भूमिका आहे. त्यांचे फॅन्सना यासिनेमाच्या रिलीजची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत. बी- टाऊनमध्ये डेब्यू करण्याआधीच जान्हवी कपूरचा मोठ्या फॅनक्लॅब आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का जान्हवी कुणाची फॅन आहे ते ?
जान्हवीने सांगितले तिला मधुबाला, वहिदा रहमान आणि मीना कुमारी खूप आवडतात आणि या तिघींची भूमिका तिला पुन्हा साकारायला आवडेल. जान्हवीपुढे अशी ही म्हणाली की मला माहिती आहे की त्यांच्यासारखे बनणे सोपे नाहीय.
काही दिवसांपूर्वीच कपूर कुटुंबीय जान्हवीच्या सैराट सिनेमाच्या रिलीज आधी तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी जान्हवीच्या सिनेमाच्या यशासाठी तिरुपतीला साकडं घातले असले हे काही वेगळे सांगण्याचे कारण नाही.
‘धडक’ एक शानदार प्रेमकथा आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. ‘सैराट’लाही याच जोडीने संगीत दिले होते. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावले होते. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही ‘सैराट’ने सगळे रेकॉर्ड मोडले होते. हे पाहून करण जोहर यांनी अजय-अतुलला ‘धडक’साठी खास निमंत्रित केले होते. त्यांनीच ‘धडक’ला संगीत द्यावे, हा करणचा आग्रह होता. चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात.