Join us

"अक्षय कुमारच्या आईची भूमिका पुन्हा कधी करणार नाही", शेफाली शाहचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "अत्यंत वाईट…"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:37 PM

‘वक्त’ या चित्रपटात शेफालीने अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती.

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे..'दिल्ली क्राईम' वेबसिरीजमध्ये साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून तिने सर्वांचंच लक्ष वेधलं. तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं शिवाय तिला अनेक पुरस्कारही मिळाले.  एका मुलाखती दरम्यान शेफालीने तिच्या आयुष्याशी आणि चित्रपटांशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा केला. शेफाली २००५ मध्ये आलेल्या ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल देखील बोलली. २००५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात शेफालीने अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. शेफाली वयाने अक्षय कुमारपेक्षा खूपच लहान आहे, मात्र तरी तिला या चित्रपटात आईची भूमिका देण्यात आली होती, यावर आता शेफालीने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. 

‘इंडियन एक्सप्रेस’च्या एक्सप्रेस अड्डामध्ये शेफाली शाहने ‘वक्त’ चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला. यावर शेफाली शाह म्हणाली की, “ही भूमिका साकारण्याचे कारण आहे. मात्र, ‘मी माझ्या आयुष्यात अक्षय कुमारच्या आईची भूमिका कधीच साकारणार नाही”, असेही तिने यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावेळी शेफालीने अत्यंत वाईट वागणूक देणाऱ्या एका दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केल्याचा खुलासा केला. तसेच आपण कधीही पडद्यावर अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

शेफालीला सेटवरील हायराकीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली, “मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं, याचा मला आनंद आहे. असं उत्तर ऐकायला चांगलं वाटतं म्हणून मी बोलत नाहीये, तर हे खरं आहे. मी कदाचित एका दिग्दर्शक आणि एका अभिनेत्याबरोबर काम केले असेल, जे अत्यंत वाईट वागणूक देणारे होते. त्याशिवाय, मी सर्व अशा दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे, ज्यांना वाटतं की कलाकार फक्त कलाकार नसून सहकारी असतात.” त्यानंतर शेफाली हसून म्हणाली, “मी वचन देते की मी पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही.”

शेफाली शाहने 18 वर्षांपूर्वी अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. दोघे 2005 मध्ये 'वक्त' चित्रपटात एकत्र दिसले होते. यामध्ये शेफालीने खिलाडी कुमारच्या आईची आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यावेळी अक्षयचे वय 37 आणि अभिनेत्रीचे वय 32 वर्षे होते. अमिताभ, अक्षय आणि शेफाली व्यतिरिक्त या चित्रपटात प्रियंका चोप्रा देखील होती. 

 

टॅग्स :सेलिब्रिटीअक्षय कुमारअमिताभ बच्चन