यावर्षी एप्रिलमध्ये, शेफाली शहा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'समडे' ऑस्कर प्रमाणित '५१ व्या वार्षिक यूएसए फिल्म फेस्टिव्हल'च्या आंतरराष्ट्रीय लघुपट आणि व्हिडीओ स्पर्धेसाठी निवडला गेला होता. अभिनेत्री लिखित आणि दिग्दर्शित हा लघुपट जर्मनीतील स्टटगार्टच्या १८ व्या भारतीय चित्रपट महोत्सवात अधिकृतपणे प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फिचर फिल्म, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि अॅनिमेशन प्रकारात दाखवला जाईल.
‘समडे’ ही दोन स्त्रियांची कहाणी आहे. त्यांच्यातील नात्याशी संबंधित आहे. विधी, एक फ्रंटलाइन वारियर आहे, जी आजच्या वैद्यकीय स्थितीत अडकली आहे. १५ दिवसांनंतर ती ड्युटीवरून ७ दिवसांच्या विलगीकरणासाठी घरी आली. परंतु, त्याला घर म्हटले जाऊ शकते? जिथे तिच्या आणि तिच्या आईमध्ये फक्त एक अंतर आहे, जे अल्झायमर आहे. ते भूतकाळ आणि भविष्यकाळ याबद्दल बोलतात, ज्यांमध्ये वर्तमानाचा मागमूसही नाही. काही प्रश्न वास्तविक आहेत तर काही काल्पनिक आहेत. त्यांच्यामध्ये जे काही होते, जे असू शकते आणि काय घडू शकते, हे सर्व त्यांच्या नात्याशी संबंधित आहे.
युरोपमधील सर्वात मोठ्या भारतीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असणाऱ्या, स्टटगार्टचा १८ वा भारतीय चित्रपट महोत्सव २१ ते २५ जुलै २०२१ या कालावधीत होत असून मुख्य प्रवाहातील हिंदी प्रॉडक्शन तसेच डॉक्यूमेंटरी, अॅनिमेशन आणि शॉर्ट फिल्मसह विविध शैली यामध्ये समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त, महोत्सवाच्या आयोजक नवनवीन चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी उत्सुक आहेत. कोविड-19 मुळे, हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार असून प्रेक्षकांना व्हर्च्युअल उत्सवाचा अनुभव देईल.