Join us

'मिस्टर इंडिया' मध्ये झुरळाला पाजली ओल्ड माँक, नशेतच त्याने... शेखर कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 3:58 PM

एका सीनमध्ये एक झुरळ श्रीदेवीच्या मागे पळतं आणि श्रीदेवी त्याला प्रचंड घाबरते.

अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांचा 1987 साली आलेला 'मिस्टर इंडिया' (Mr India) सिनेमा खूप गाजला. आजही हा सिनेमा लहान मुलांचाच नाही तर मोठ्यांचाही आवडीचा आहे. 'मोगॅम्बो खूश हुआ' हा सिनेमातील डायलॉग अजूनही कित्येक ठिकाणी वापरला जातो. काही दिवसांपासून सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. बोनी कपूर यांनी दुजोराही दिला आहे. तर आता दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सिनेमाच्या शूटिंगवेळचा एक मजेशीर किस्सा सांगितला.

दिग्दर्शक शेखर कपूर डेली पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "मी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आजमी आम्ही दोघांनी मिळून झुरळाकडूनही अभिनय करुन घेतला होता. एका सीनमध्ये एक झुरळ श्रीदेवीच्या मागे पळतं आणि श्रीदेवी त्याला प्रचंड घाबरते. त्या सीनमधलं झुरळ हे नकली नव्हतं तर खरोखरंच होतं. आम्ही विचार करत होतो की झुरळाकडून कसा अभिनय करुन घ्यायचा. तेव्हा आम्ही ओल्ड माँक रम आणली आणि थोडी झुरळासमोर ओतली. आम्हाला वाटलं त्यालाही नशा चढेल. आम्हाला खरोखरंच असं वाटलं की ओल्ड माँक मुळेच त्याला नशा चढली आणि त्याला ती आवडलीही होती.'

काही दिवसांपूर्वीच शेखर कपूर यांनी एक मजेशीर ट्विटही केलं होतं. ११ वी फेल हाऊस हेल्पने AI च्या मदतीने मिस्टर इंडिया 2 ची स्क्रीप्ट लिहिली आहे. नीलेश फक्त १८ वर्षांचा आहे. त्याला पुढे शिकायचं नाही. हे तंत्रज्ञान पाहून मी दंग झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

टॅग्स :शेखर कपूरसिनेमाअनिल कपूरश्रीदेवी