Join us

#justiceforSushantforum शेखर सुमनने सुरू केले फोरम, सुशांत आत्महत्ये प्रकरणी केली CBI चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 8:57 PM

अभिनेता शेखर सुमनला सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, यावर विश्वास बसत नसल्याचे सांगितले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याच्या निधनामुळे कलाकारांसोबत चाहत्यांना धक्का बसला आहे. बरेच कलाकार पुढे येऊन बॉलिवूडमधील धक्कादायक खुलासे करत आहेत. त्यात अभिनेता शेखर सुमनने सुशांतच्या आत्महत्येवर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. शेखर सुमनने एक फोरम सुरू केली आहे. या माध्यमातून सीबीआय चौकशीसाठी दबाव आणता येईल. शेखर सुमनने सुरू केलेल्या #justiceforSushantforum या फोरमला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

सुशांत सिंग ,राजपूतच्या आत्महत्येनंतर शेखर सुमन सातत्याने ट्विट करत आहे. शेखर सुमनने ट्विट केले की, सुशांत सिंग राजपूतसारखा हुशार, हिमती, प्रचंड इच्छा शक्ती असलेल्या व्यक्तीने जर आत्महत्या केली असेल तर नक्कीच त्याने आत्महत्येपूर्वी पत्र लिहून ठेवले असणार. इतरांप्रमाणेच मला मनापासून वाटते आहे जे दिसते आहे त्यापेक्षा परिस्थिती बरीच वेगळी आणि गंभीर आहे.

शेखरने दुसऱ्या ट्विट केले की, मी  #justiceforSushantforum या नावाने फोरम बनवत आहे. जिथे मी सर्वांना विनंती करतो की या फोरमच्या माध्यमातून सरकारवर सीबीआय चौकशीसाठी दबाव आणता येईल. अशा पद्धतीने अत्याचार, गटबाजी व माफियागिरी बंद होईल. मला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे.

शेखर सुमनचे हे ट्विट चर्चेत आले आहे. यापूर्वीदेखील त्याने सुशांतच्या आत्महत्येनंतर एक ट्विट केले होते. त्यात त्याने म्हटले होते की, सिनेइंडस्ट्रीत वाघ होऊन फिरणारे आज सुशांतच्या चाहत्यांचा आक्रोश पाहून घाबरुन लपून बसले आहेत.

टॅग्स :शेखर सुमनसुशांत सिंग रजपूत