शेखर सुमनने सोमवारी संध्याकाळी सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची पटाण्यामध्ये जाऊन भेट घेतली. सुशांतच्या वडिलांना भेटल्यानंतर शेखर सुमनने सोशल मीडियावर सांगितले की सुशांतच्या वडिलांची हालत. शेखर सुमनने लिहिले, सुशांतच्या वडिलांना भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आम्ही काहीवेळ त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अजूनही ते शॉकमध्ये आहेत. मला वाटते की आपले दु:ख व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गप्प राहणे. शेखर सुमन यांच्या आधी नाना पाटेकर यांनीदेखील सुशांतच्या वडिलांची भेट घेतली आहे.
माध्यमांशी बोलताना शेखर म्हणाला की, सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या आहे. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी शेखर सुमनने केली आहे. काही दिवसांपूर्वी शेखर सुमनने एक फोरम सुरू केली आहे. शेखर सुमनने सुरू केलेल्या #justiceforSushantforum या फोरमला खूप चांगला रिस्पॉन्स मिळला आहे.
सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. बॉलिवूडमधील प्रस्थापित मंडळींनी सुशांतला चित्रपट मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाहीवर टीका होत आहे. त्यामुळेच अनेक बड्या कलाकारांनी सुशांतच्या कुटुंबीयांशी संवाद साधलेला नाही.