Join us

All Is Well, अध्ययन सुमनबाबतची बातमी खोटी, शेखर सुमनने दिली मीडियाला खरी बातमी, वाचा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:11 PM

क्षणाचा विलंब न करता आपल्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. अध्ययन सुखरुप असल्याचे कळाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला,

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाने सा-यांनाच मोठा धक्का बसला होता. या घटनेवर आवाज उठवणारा अभिनेता शेखर सुमनच्या पायाखालची जमीनच घसरली जेव्हा एका वृत्तवाहिनेनी शेखर सुमनचा मुलगा अध्ययनची आत्महत्या केल्याची बातमी ऐकली, मात्र असे काही घडले नसून बातमी खोटी असल्याचे समोर आले, अध्ययन सुरक्षित दिल्लीमध्ये असल्याचे शेखर सुमन यांनी सांगितले होते. 

एका वृत्तवाहिनीने  अध्ययनने आत्महत्या केल्याची फेक बातमी  दाखवली होती.ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ही  बातमी ऐकताच शेखर सुमनला मात्र मोठा धक्का बसला होता. क्षणभर त्यांच्या पाया खालची जमीनच घसरली होती. क्षणाचा विलंब न करता आपल्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. अध्ययन सुखरुप असल्याचे कळाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला, यानंतर मात्र शेखर सुमन यांनी फेक बातम्या परवल्याबदल्ल त्या वृत्तवाहिनीविरोधात कायदेशीर कारवाई केली होती.

शेखर सुमनचा मोठा मुलगा आयुषचे हृदयविकाराच्या आजारामुळे निधन झाले होते. त्यावेळी आयुष अवघ्या 11 वर्षांचा होता. वृत्तवाहिनीने आयुषऐवजी चुकून अध्ययनच्या नावाने बातमी चालवली होती.

सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेते शेखर सुमन सुरूवातीपासून आवाज उठवत होते. मुलगा अध्ययन सुमनने त्याला म्युझिकल ट्रिब्यूट दिलं होतं. अध्ययनने सुशांतचा सिनेमा 'एमएस धोनी'तील गाणं 'जब तक'चं रीमेक केल होतं. या गाण्यात अध्ययनने सुशांतचं आयुष्य लिहिलंय. सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेने तिच्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

अध्ययन सुमनने हे गाणं यूट्यूब चॅनलवरही शेअर केलं होतं. सोबतच एक नोट लिहिली आहे की, ही मनापासून सुशांतला श्रद्धांजली  आणि हे गाणं चॅनलवर मॉनेटाइज केलं गेलं नाहीये. या गाण्यात सुशांत गिटार वाजवता, मस्ती करताना आणि अंकितासोबतही दिसतोय.

टॅग्स :शेखर सुमनअध्ययन सुमन