कंगना राणौतच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांना शेखर यांनी ‘पेड ट्विटर’ म्हटले आहे. ‘कोणत्याही कारणास्तव एका कलाकाराच्या समर्थनार्थ आलेल्या चमचांमुळे आणि पैसे दिलेल्या समर्थकांमुळे मला भीती वाटत आहे’, असे शेखर यांनी म्हटले.One cocained actress was carrying the burden of her non existent stardom.She has fallen flat on her face n how.Guess this is poetic justice.— Shekhar Suman (@shekharsuman7) February 27, 2017
काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने एका मुलाखतीत आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडविषयी सांगितले होते की ती अशांना पूर्णत: विसरून गेली आहे.’ शेखर सुमन यांचा पुत्र अध्ययन सुमन हा कंगना राणौत हिचा माजी बॉयफ्रेंड आहे. हृतिक रोशनसोबतच्या विवादानंतर अध्ययन सुमन याने कंगना ड्रग घेणारी असल्याचे सांगून आपल्या संबंधादरम्यान शिवीगाळ आणि गैरवर्तणूक केल्याचे म्हटले होते.शेखर सुमन यांच्या या ट्विटने हा विवाद पुन्हा उफाळून आला आहे. या ट्विटनंतर अनेकांनी ट्रोल करीत सुमन यांना खरीखोटी सुनावली. त्यानंतर त्यांनी आपले ट्विट दुसºयासाठी होते, असाही खुलासा केला.कंगना राणौत हिचा रंगून हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या काही दिवसात फारशी कमाई करू शकला नाही. अर्थात तिच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे.Im horrified at the paid lackeys and sycophants who have jumped in defence of a lumpen so- called star.shame on you,you paid twitteratis.— Shekhar Suman (@shekharsuman7) February 27, 2017