Join us

लेकाची एक्स गर्लफ्रेंड कंगनासाठी प्रचार करणार शेखर सुमन? म्हणाला - "तिने बोलावलं तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:32 IST

शेखर सुमन हे लेक अध्ययन सुमनची एक्स गर्लफ्रेंड कंगना रणौतच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का, अशी चर्चा निर्माण झालीय. त्यावर शेखर सुमन यांनी मौन सोडलंय (shekhar suman, adhyayan suman, kangana ranaut)

सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक कलाकार सुद्धा उमेदवार म्हणून उभे आहेत. या कलाकारांमध्ये महत्वाचं नाव म्हणजे कंगना रणौत. हिमाचल प्रदेशातीलमंडी भागात कंगना भाजपाची उमेदवार म्हणून उभी आहे. याशिवाय अगदी काहीच दिवसांपुर्वी अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यावेळी कंगनाच्या प्रचारात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारल्यावर शेखर काय म्हणाले बघा.

सर्वांना माहितच आहे की, शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनला कंगना डेट करत होती. पुढे दोघांचं ब्रेकअप झालं. इतकंच नव्हे तर कंगनाने माझ्यावर काळीजादू केली, असाही आरोप अध्ययनने तिच्यावर लावला. आता अध्ययनचे वडील अर्थात शेखर आणि कंगना भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहेत. त्यावेळी कंगनाच्या प्रचारासाठी शेखर सुमन मैदानात उतरणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर शेखर म्हणाले, "जर तिने मला बोलावलं तर का नाही जाणार मी? हा माझा हक्क आणि कर्तव्य सुद्धा.!"

शेखर सुमन यांनी दोन दिवसांपुर्वी दिल्लीत जाऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना अजून उमेदवारी जाहीर झाली नाही. तर दुसरीकडे कंगना रणौत ही हिमाचल प्रदेशातीलमंडी भागाची उमेदवार आहे. कंगना सध्या तिच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी फिरत असून लोकांना भेटत आहे. भाजपाच्या प्रचारासाठी भविष्यात कंगना आणि शेखर एकाच रंगमंचावर दिसले, तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :कंगना राणौतशेखर सुमनअध्ययन सुमनहिमाचल प्रदेशमंडीनिवडणूकलोकसभा